Rajesh Khanna Birth Anniversary : 'तो माणूस विचित्रच होता, त्यांची भीती वाटायची!' का म्हणाल्या डिंपल कपाडिया असं?

बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या राजेश खन्ना यांची लोकप्रियता अजुनही कायम आहे.
Rajesh Khanna Birth Anniversary
Rajesh Khanna Birth Anniversaryesakal
Updated on

Rajesh Khanna Birth Anniversy wife Dimple Kapadiya : बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या राजेश खन्ना यांची लोकप्रियता अजुनही कायम आहे. ७० ते ८० च्या दशकांत देशातील सर्वाधिक पॉप्युलर अभिनेता म्हणून राजेश खन्ना यांचे नाव होते. सर्वाधिक काळ सुपरस्टार राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर असून तो अजुनही कायम आहे.

राजेश खन्ना यांच्या बर्थ अॅनिव्हरसरी च्या निमित्तानं त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक सहकारी कलाकारांनी खन्ना यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामध्ये त्यांची पत्नी डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना हे काय रसायन होतं याविषयी सांगून नेटकऱ्यांना धक्का दिला आहे.

Rajesh Khanna Birth Anniversary
Twinkle Khanna Birthday: वयाच्या ४९ व्या वर्षी ट्वींकल खन्ना करतेय अभ्यास, लंडनमध्ये करतेय मास्टर्सची तयारी

राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ या तीन वर्षाच्या काळात त्यांनी सलग १५ हिट चित्रपट दिले होते. तो विक्रम अजुनही अबाधित आहे. १९६६ मध्ये चेतन आनंद यांच्या आखिरी खत नावाच्या चित्रपटातून राजेश खन्ना यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी काही मागे वळून पाहिले नाही.

Rajesh Khanna Birth Anniversary
Deepika Padukone : दीपिकाच्या 'त्या' बिकिनीची किंमत माहितंय का?

शेवटपर्यत साथ सोडली नाही....

सुरुवातीला राजेशची यांचा स्वभाव हा फार वेगळा होता. आपण बऱ्याचशा मुलाखतीतून त्याविषयी जाणून घेतले असेल. मात्र मी जेव्हा त्यांना त्यांच्या अखेरच्या काळात जवळून पाहिलं तेव्हा मात्र त्यांचे वेगळेच व्यक्तिमत्व माझ्यासमोर आले होते. तो माणूस ना कुणाला सुखी ठेवत होता ना सुखी राहू देत होता. मी फक्त त्यांच्याजवळ बसून असायचे. याचे कारण म्हणजे त्यांना काय हवं काय नको हे पाहायला.

Rajesh Khanna Birth Anniversary
Viral Video : शाहरूख दीपिकाच्या 'पठाण'मधील गाण्यावर आंटीचा डान्स

वास्तविक डिंपल यांनीच असे वक्तव्य केले असे नाही तर त्यांची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मुमताज यांनी देखील राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की, तो माणूस वेगळच रसायन होतं. त्यांना कुणाशी जास्त मैत्री आवडत नसायची. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना जरा जपूनच राहावे लागत असायचे. असे मुमताज यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.