खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं

बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या कलाकृतींनी अजरामर झालेल्या अनेक प्रतिभावान दिग्दर्शक आहेत.
खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं
Updated on

बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या कलाकृतींनी अजरामर झालेल्या अनेक प्रतिभावान दिग्दर्शक आहेत. त्या प्रत्येकाची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. त्या दिग्दर्शकांनी तयार केलेल्या चित्रपटांची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्या कलाकृतींना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. त्या चित्रपटांशी त्याचं अनोख नातंही आहे. ऋषीकेश मुखर्जी (hrishikesh bannerji) यांचे चित्रपट आजही तितक्याच तन्मयतेनं पाहिले जातात जितके त्याकाळी पाहिले जात होते. त्यावेळी त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. केवळ मनोरंजन यावर भर न देता त्यांनी त्यातून प्रेक्षकांच्या मनाची मशागत करणाऱ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी त्यातून केला होता. आज मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जुना गोलमाल जर का पाहिला असेल त्यात अमोल पालेकर यांनी केलेली भूमिका आजही तितकीच मनोरंजक आणि टवटवीत वाटते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषीकेश मुखर्जी यांनी केले होते. मुखर्जी यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांना आपल्या चित्रपटातून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा ऋषीकेश मुखर्जी हे नमक हरामचा क्लायमॅक्स शुट करत होते तेव्हा त्यामध्ये राजेश खन्ना (rajesh khanna) यांच्याबद्दलचा किस्सा फेमस झाला होता. तो सीन काही मुखर्जी यांच्या मनासारखा झाला नाही. त्यावर मुखर्जी नाराज झाले होते. आपल्याला हा सीन परफेक्ट द्यायचा आहे असा राजेश खन्ना यांचा विचार होता. मात्र त्याला मुखर्जी यांचा विरोध होता. याचे कारण त्यांनी यापूर्वी त्याच सीनचे दोन टेक घेतले होते. त्यामुळे त्यांना आता पुन्हा रिटेक घ्यायचा नव्हता. राजेशजी काही ऐकायला तयार नाही. त्यांनी अनेकदा मुखर्जी यांना विनंतीही केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

अभिनेता हा बऱ्याचदा दिग्दर्शकाला काय हवं आहे याचा विचार न करता स्वता:च्या खिशातील काही गोष्टींची भर त्यात टाकतो. त्यामुळे त्या कलाकृतीला जो न्याय दिला जायला हवा तो मिळत नाही. अशी भूमिका मुखर्जी यांची होती. या उत्तरानंतर राजेश खन्ना यांची मुखर्जी यांना उत्तर देण्याची डेरिंगच झाली नाही. आणि नमक हरामच्या क्लायमॅक्सचा तो सीन दुसऱ्या टेकमध्ये शुट झाला होता. कुठलीही गोष्ट करताना त्यात पूर्णपणे समर्पण हे मुखर्जी यांचे खास वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्यांचे चित्रपट आजही पाहताना एक वेगळ्या प्रकारचा ताजेपणा आपल्याला जाणवतो. त्यातील प्रसन्नता मनाला भावल्याशिवाय राहत नाही.

कलकत्ता विद्यापीठातून मुखर्जी यांनी विज्ञान विषयात पदवी घेतली होती. ते त्या विद्यापीठातील गणित आणि विज्ञानाचे नावाजलेले प्राध्यापकही होते. ते उत्तम बुद्धिबळपटूही होते. मात्र त्यांचा जीव सिनेमात रमला. सिनेमाशिवाय आपण दुसरं काही करु शकणार नाही. हे त्यांच्या अंर्तमनाला जाणवले आणि त्यांनी दिग्दर्शक व्हायचं असा निर्णय घेतला. त्यांनी जेव्हा प्रथमेश बौरा यांचा मुक्ती नावाचा चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा आपल्यालाही अशाप्रकारची कलाकृती तयार करता यायला हवी. असं त्यांना वाटून गेलं. आणि त्यांनी तयारी सुरु केली. अखंड परिश्रम, ध्यास आणि चिकाटीच्या जोरावर ते यशस्वी झाले.

आनंद, चुपके चुपके, बावर्जी, गोलमाल, गुड्डी, नमक हराम, सत्यकर्म, अभिमान, अनुपमा, मिली, किस्सा खुर्ची का, किसी से ना कहना यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन ऋषीकेश मुखर्जी यांनी केले. त्यांचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांना कमालीचे आवडले. त्यातही आनंद आणि गोलमालची जादू आजही कायम आहे.

खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं
'राजेश खन्ना यांच्यामुळे चित्रपटांचा घसरला दर्जा'
खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं
सिद्धूची जागा घेणार 'अर्चना'! सोशल मीडियावर भन्नाट मीम्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.