कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांच्यासह इतक अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली. त्याचसोबत ऑक्सिजन, बेड्स यांसारख्या वैद्यकीय सुविधा पुरविल्या. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अर्थात अभिनेते रजनीकांत Rajinikanth हे मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. रजनीकांत यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५० लाख रुपये जमा केले आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना धनादेश सुपूर्द केला. (Rajinikanth donates 50 lakh rupees towards Tamil Nadu CM Covid 19 relief fund)
याआधी रजनीकांत यांची मुलगी सौंदर्यानेही मुख्यमंत्र्यांकडे एक कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. पती विशागन, सासरे आणि नणंद यांच्यासोबत मिळून सौंदर्या यांनी १४ मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
तमिळनाडूत कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी रजनीकांत यांच्यासह सुरिया, अजित आणि शिवकार्तिकेयन या इतर कलाकारांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली. दरम्यान रजनीकांत यांनी नुकताच कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होती.
रजनीकांत यांनी नुकतंच आगामी 'अन्नाथे' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा करत आहेत. शूटिंग पूर्ण होताच ते खासगी विमानाने चेन्नईला परतले. डिसेंबर २०२० मध्ये या चित्रपटाच्या टीममधील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने शूटिंग थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी रजनीकांत यांचीसुद्धा तब्येत बिघडली होती. चार महिन्यांनंतर एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात झाली. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.