Rajinikanth fans Vs Thalapathy Vijay fans: साउथ सपुरस्टार थलायवा रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट काल म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. तब्बल दोन वर्षानं रजनीकांतने मोठ्या पडद्यावर कडक एंट्री मारली. सुपरस्टारचा हा 169 वा चित्रपट आहे.
रजनीकांतचा 'जेलर' हा तमिळ भाषेत तयार झालेला आहे. मात्र इतर भाषेतही चित्रपट रिलिज करण्यात आला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच रजनीचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक होते.
चित्रपट रिलिज होताच लोकांनी रजनीकांतच्या पोस्टरवर दूध आणि पुष्पहार अर्पण केला तर काहींनी थेट त्याची आरतीही केली. दक्षिणेत या चित्रपटाची तुफान क्रेझ आहे.
अनेकांनी थिएटरमध्ये नाचायलाही सुरुवात केली असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात रजनीकांतचे चाहते जल्लोष करताना दिसताय.
अशातच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यात तरुणांची दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे, ज्याचं कारण हे रजनीकांतचा जेलर चित्रपट ठरला आहे.
अनेकांनी हा शो फर्स्ट डे फर्स्ट शो पहिला. त्यानंतर ज्यांनी हा शो पाहिला अशा काही प्रेक्षकांना पत्रकारांनी 'जेलर' चित्रपटाचा रिव्हूय विचारला आहे. त्यावेळी एकानं चित्रपट आवडला नाही म्हणुन नकारात्मक रिव्हूय दिला. त्यामुळे तिथल्या रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दोन व्यक्तींना मारहाण केली.
जेव्हा ही हाणामारी झाली त्यावेळी मारणाऱ्या व्यक्तीनी असा नकारात्मक रिव्हूय देणारे हे 'थलपथी' विजयचे चाहते असल्याचा आरोप केला आणि मुद्दाम थलायवाच्या चित्रपटाचं नुकसान व्हाव या हेतूने ती लोक नकारात्मक रिव्हूय देत असल्याचं सांगितलं.
यापुर्वी देखील थलायवा रजनी आणि विजयचे चाहते बऱ्याचदा वाद विवाद झाले आहेत. 'जेलर' ऑडिओ लाँचदरम्यान रजनीकांत यांनी सांगितलं होतं की त्यांच्या जवळच्या एका मित्राने त्यांना नेल्सन दिलीपकुमारसोबत काम करण्याआधी विचार करावा असा सल्ला दिला होता.
त्याला कारण म्हणजे विजयचा बीस्ट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे जेलरही फ्लॉप होईल अशी भिती त्यांना होती. मात्र जरी चित्रपटाचा रिव्हि्यू चांगला नसला तरी बीस्टनं कमाई चांगली केली होती असंही तो म्हणाला होता.
मात्र रजनीकांतचं हे वक्तव्य 'थलपथी' विजय च्या चाहत्यांनी मुळिच पटलं नव्हतं. त्यांमुळे सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांमध्ये तुफान युद्ध रंगल होतं. आता त्याचाच परिणाम असा थिएटर बाहेर हाणामारीत प्रेक्षकांना दिसला.
जेलर बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात रजनीकांतबरोबरच मोहन लाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, रम्या कृष्णन, विनायकन, मिर्ना मेनन, तमन्ना, वसंत रवी, नागा बाबू आणि योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत.
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 44.50कोटींचे बंपर कलेक्शन केले आहे. तर विकेंड पर्यंत हा चित्रपट 100 कोटीचा टप्पा पार करेल असा विश्वास रजनीच्या चाहत्यांना आहेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.