'आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊन होणार आहे'... देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे भाषण देशातील प्रत्येक नागरिकाला नक्कीच आठवत असेल. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या घोषणेनंतर देशात लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन देशातील सर्वच नागरिकांसाठी सारखे नव्हेत. यादिवसात देशाने अनेक असे भयानक किस्से आणि अनुभव आहेत जे पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर मनाला धक्काच बसला.
याच लॉकडाऊनवर आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ' भिड ' हा चित्रपट बनवला आहे . या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या 'भिड' या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता या बहुप्रतिक्षित 'भिड' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.
सस्पेंसने भरलेला हा ट्रेलर मोनोक्रोममध्ये आहे. 'भिड'चा ट्रेलर त्याकाळावर आधारित आहे ज्यावेळी लॉकडाऊनमुळे देशात सीमारेषा आखल्या गेल्या. या चित्रपट त्या काळातील कठोर वास्तवावर चित्रित आहे.
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर याच्या भुमिका असलेला या चित्रपटात देशव्यापी लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगार मुलभूत गरजांविना अडकून पडलेले होते आणि घराचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते.
भिड या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोरोनाच्या काळातील कथा मांडण्यात आल्या आहेत. सामान्य माणसाला न्याय मिळणे किती कठीण होऊन बसते, या सर्व घटना ट्रेलरमध्ये कैद झाल्या आहेत. 'भिड' चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
ट्रेलरमध्ये राजकुमार राव, पंकज कपूर, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा, दिया मिर्झा आणि कृतिका कामरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभव सिन्हा यांचा चित्रपट 2020 च्या लॉकडाऊन दरम्यान गरिबांच्या संघर्षावर केंद्रित आहे. हा चित्रपट 24 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.