Rajinikanth-Amitabh New Movie : 32 वर्षांनी 'बिग बी-थलायवा' एकत्र येणार! होणार मोठा धमाका

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघेही कलावंत एकमेकांचे चांगले मित्र आहे. या दोन्ही अभिनेत्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केले आहे.
Rajinikanth-Amitabh New Movie
Rajinikanth-Amitabh New Movieesakal
Updated on

Rajnikanth Amitabh Bachchan Reunite in Thalaiva 170 movie : बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्याविषयी जेवढं काही बोलावं तेवढं कमी आहे.वयाच्या ८० व्या वर्षी देखील अमिताभ यांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर देखील नेहमीच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सम्राट रजनीकांत यांचाही प्रभाव कमालीचा आहे. Rajnikanth Amitabh Bachchan Reunite

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघेही कलावंत एकमेकांचे चांगले मित्र आहे. या दोन्ही अभिनेत्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केले आहे. एकानं हिंदी चित्रपट आणि दुसऱ्यानं टॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या नावाचा दबदबा तयार केला आहे. आता एकुणच भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

एक दोन नव्हे तर तब्बल ३२ वर्षांनी हे दोन्ही महान अभिनेते एकाच चित्रपटामध्ये दिसणार आहे. 'थलाइवा 170' असे त्या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्श टीजे ज्ञानवेल हे करणार आहे. यापूर्वी रजनीकांत आणि अमिताभ यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यापूर्वी टीजे ज्ञानवेल यांनी जय भीम नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तो चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता.

ई टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, रजनीकांत यांच्या जवळच्या एका व्यक्तीनं टी जे ज्ञानवेल यांच्या नव्या चित्रपटाविषयी सांगितले आहे. त्याच चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चन हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. येत्या काही दिवसांत या चित्रपटाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी अमिताभ आणि रजनीकांत हे १९९१ मध्ये हम या चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते.

Rajinikanth-Amitabh New Movie
The Kerala Story : 'नसिरुद्दीन शाह यांची नियतच खोटी',भाजपच्या मनोज तिवारींचा संताप!

टीजे ज्ञानवेल यांचा तो चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून त्यामध्ये रजनीकांत हे एका मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.अमिताभ यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. यापूर्वी हे दोन्ही कलाकार हम, गिरफ्तार आणि अंधा कानून सारख्या चित्रपटांतून एकत्र आले होते.

Rajinikanth-Amitabh New Movie
Naseeruddin Shah: माझी चूक झाली... अखेर नसिरुद्दीन शाहांनी मागितली मराठी माणसांची माफी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.