TMKOC: दिलीप जोशी नव्हे तर बॉलिवूडचा हा प्रसिद्ध कॉमेडियन 'जेठालाल' असता, या कारणामुळे अभिनेत्याने नाकारली भूमिका

'तारक मेहता'मध्ये अभिनेता दिलीप जोशी 'जेठालाल'ची भूमिका साकारत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की दिलीपच्या आधी या भूमिकेसाठी राजपाल यादवला अप्रोच करण्यात आले होते.
jethalal
jethalal Sakal
Updated on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. जी गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

मात्र जेठालालबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ज्याची भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की दिलीपच्या आधी ही भूमिका बॉलीवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादवला ऑफर झाली होती.

चित्रपटांमधील सर्वोत्तम कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेला राजपाल यादव जेव्हा सिद्धार्थ काननच्या शोमध्ये पोहोचला तेव्हा त्याने खुलासा केला की, शोच्या सुरुवातीला जेठालालची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण ही भूमिका नाकारली. कारण तेव्हा त्याला दुसरे काही काम होते. याबाबत राजपाल म्हणाला, "जेठालालच्या व्यक्तिरेखेची ओळख एका चांगल्या कलाकाराने केली आहे."

jethalal
Karan Johar Viral Video: 'एअरपोर्ट विकत घेतलायस का..बरं झालं पोलिसांनी इज्जतच काढली..', करण जोहर ट्रोल

राजपाल यादवने 1999 मध्ये 'दिल क्या करे' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. पण त्याला खरी प्रसिद्धी 2000 साली राम गोपाल वर्माच्या 'जंगल' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्यांनी 'सिप्पा' ही भूमिका साकारली होती. ज्याद्वारे या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडली.

jethalal
Mrunal Thakur: मृणालचं झालं ब्रेकअप? रडत फोटो शेअर करत म्हणाली...

हा अभिनेता अखेरचा कार्तिक आर्यनसोबत 'शेहजादा' चित्रपटात दिसला होता. या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 'भूल भुलैया 1 आणि 2', 'पति पत्नी और वो', 'हंगामा', 'जुडवा', 'भूतनाथ', 'हेरा फेरी' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.