Raju Srivastav Health Update : राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत आनंदाची बातमी

राजूला शुद्धीवर येण्यासाठी एक आठवडा लागू शकतो
Raju Srivastav Health Update
Raju Srivastav Health UpdateRaju Srivastav Health Update
Updated on

Raju Srivastav Health Update प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे. राजूचे व्यवसाय व्यवस्थापक नयन सोनी यांनी त्याच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. राजू उपचाराला प्रतिसाद देत आहे. त्याच्या शरीराचे अवयव हलत आहेत. राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी जिम करीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.

राजू लवकर बरा व्हावा यासाठी लाखो चाहते प्रार्थना करीत आहेत. राजू श्रीवास्तवचे व्यवसाय व्यवस्थापक नयन सोनी यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता त्याच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली आहे. औषधांचा परिणाम शरीरावर होत होता. सध्या त्याला काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात नाही आहे.

Raju Srivastav Health Update
Aamir Khan : लाल सिंह चड्ढामुळे आमिरला बसला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजूला शुद्धीवर येण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनी आधीच निवेदन जारी केले होते की, राजूची (Raju Srivastav) प्रकृती हळूहळू बरी होत आहे. त्याच्या चाहत्यांना आमचे एकच आवाहन आहे की, त्यांनी अफवांकडे लक्ष देऊ नये. राजू लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ऑडिओ संदेश पाठवला

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राजू श्रीवास्तवला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणारा ऑडिओ संदेश पाठवला होता. ऑडिओमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले, बस राजू, राजू उठ आणि आम्हा सर्वांना हसायला शिकवत राहा. असे सांगितले जात आहे की, राजू श्रीवास्तवला अमिताभ बच्चन यांचा ऑडिओ संदेश ऐकवला होता. जेणेकरून त्याचा मेंदू प्रतिसाद देऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.