Raju Srivastava Comedy: कधी कुणाचा मेव्हणा तर, कधी कुणाचा जावई होणाऱ्या राजुनं प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्या राजुनं आता आपल्या सगळ्यांमधून एक्झिट घेतली आहे. गेल्या ४२ दिवसांपासून तो दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या जाण्यानं मनोरंजन विश्वाला मोठा हादरा बसला आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी राजुच्या तब्येतीची विचारपूस करुन त्याच्या चाहत्यांना देवाकडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. राजुचा ब्रेन डेड झाल्यानं तो उपचाराला दाद देत नसल्याचे सांगण्यात आले होते. यापूर्वी राजुच्या परिवाराकडून त्याच्या आरोग्याबाबत माहिती देण्यात आली होती. Raju Srivastava Famous Character
प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक शेखर सुमन यांनी देखील काही दिवसांपूर्वी राजुच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. राजुचा मनोरंजन विश्वातील प्रवास हा खडतर होता. काही केल्या आपल्याला बॉलीवूडमध्ये प्रवेश करायचा अशी त्याची जिद्द होती. ती त्यानं पूर्ण केली. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात त्याचा हातखंडा होता. कुठल्याही परिस्थितीवर मार्मिक भाष्य करुन त्यातून विनोद निर्मिती करण्याची कला त्याच्याकडे होती. राजुच्या जाण्यानं मनोरंजन विश्वाला मोठा हादरा बसला आहे. राजुनं साकारलेला गजोधर भैय्या हा त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम घर करुन बसला आहे.
राजुची स्टाईल ही हटके होती. टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये कॉमेडियनची कमी नाही. मात्र वेगळेपण असणाऱ्या कलाकारांमध्ये राजुच्या नावाचा समावेश होतो. त्यानं अल्पवधीत मोठी लोकप्रियता मिळवली होती. अथक संघर्ष, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यानं आपली वेगळी वाट निर्माण केली होती. राजुचं व्यक्तिमत्व हे प्रभावी होतं. त्याचा स्वभाव हा मनमिळावू होता. म्हणून तर नवोदितांना त्याच्याशी संवाद साधताना कधी संकोचल्यासारखे झाले नाही. तो एक अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणून प्रभावशील व्यक्तिमत्वाचा होता. असे त्याच्या परिचयातले आवर्जुन सांगतात.
राजुनं चित्रपटामधूनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. भावनांओंको समझो, मैं प्रेम की दिवानी हू, बॉम्बे टू गोवा, सारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं होतं. राजुचं कॉमेडी टायमिंग हे जबरदस्त होतं. त्याच्या त्या टायमिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यानं मनोरंजन विश्वात आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियावर देखील तो चर्चेत असणारा सेलिब्रेटी होती. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या अॅवॉर्ड शोमध्ये मनोरंजनासाठी हक्कानं राजुला निमंत्रित केलं जात असे. विनोदावर राजुची हुकूमत होती. त्याच्या जाण्यानं आता मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.