Raju Srivastava: रिक्षाचालक, कॉमेडियन ते बॉलीवुड! थक्क करणारा प्रवास..

एका साध्या गावातून येऊन इथपर्यंत पोहोचणं सोप्पं नव्हतं, लय स्ट्रगल करून राजू श्रीवास्तव झाले कॉमेडीचे बादशाह..
raju srivastava passed away : from auto rikshaw driver to stand up comedian in Bollywood struggle nsa95
raju srivastava passed away : from auto rikshaw driver to stand up comedian in Bollywood struggle nsa95sakal
Updated on

Raju srivastava passed away : गेली काही दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार म्हणजे स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली 42 दिवस ते दिल्लीतील एम्स रुग्णालायत उपचार घेत होते. १० ऑगस्ट रोजी त्यांना जीम मध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार करूनही त्याला यश आले नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावार मोठी शोककळा पसरली आहे. पण राजू श्रीवास्तव यांना ही लोकप्रियता इतकी सहज मिळाली नव्हती. अत्यंत स्ट्रगल करून ते इथपर्यंत पोहोचले होते. रिक्षा चालक ते बॉलीवुड हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. (raju srivastav passed away : from auto rikshaw driver to stand up comedian in bollywood)

राजू श्रीवास्तव हे भारतभरातील घराघरात पोहोचलेले एक प्रसिद्ध कॉमेडियन. त्यांचे काही डायलॉग, त्यांच्या स्टॅन्डअप मधील पात्रं अजूनही लोक विसरलेले नाहीत, म्हणून त्यांना राजू श्रीवास्तव यांच्या पलीकडे 'गजोधर' आणि 'राजू भैया' अशीहीवेगळी ओळख मिळाली. त्यांचे गजोधर हे पात्र बरेच गाजले. २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर शहरात त्यांचा जन्म झाला. राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे देखील कवी होते.

राजू यांचा स्वभाव पहिल्यापासून अत्यंत मिश्किल, थट्टा मस्करी करणारा.. याशिवाय इतरांच्या नकला करण्याची हौस त्यांना भारी. त्यामुळे आपल्या विनोदाने लोकांना आनंद मिळतोय हे त्यांना पक्के समजले होते म्हणूनच त्यांनी कॉमेडियन व्हायचा निर्णय घेतला. १९८२ च्या आसपास त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली आणि कानपूरहुन थेट मुंबई गाठली. ऐंशीच्या दशकात एकीकडे हिरोच्या बरोबरीने एक विनोदवीर नट लागत असे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळेल या आशेने ते मुंबईत आले होते.

राजू मुंबईत आले खरे पण काम काही मिळेना. शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी उद्योग हवा म्हणून त्यांनी रिक्षा चालवण्याचे ठरवले. याच प्रवासात त्यांना एन चंद्रा यांच्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट झाला होता. पुढे 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'आये आठवा खदानी रुपया, 'बिग ब्रदर', 'मै प्रेम कि दिवानी हू', ' बॉम्बे टू गोवा' यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ते स्टँडअप कॉमेडीमुळे.

राजू यांचा स्टँडअप कॉमेडीचा प्रवासही गमतीशीर होता. सुरवातीच्या काळात विनोदी कार्यक्रमांचे त्यांना अवघे ५० रुपये मिळत. ‘टी टाईम मनोरंजन’ या टीव्हीवरील कार्यक्रमातून त्यांनी छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले. राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे लोकप्रिय ठरलेले पात्र. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पुढे त्यांना बिग बॉस, कॉमेडी का महा मुकाबला, कॉमेडी सर्कस असे अनेक कार्यक्रम मिळाले आणि राजू श्रीवास्तव यांची ख्याती जगभर पोहोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.