Raju Srivastav PM Modi Reaction: राजूचं जाणं हे चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. दीड दशकांहून अधिक काळ त्यानं चित्रपट, मालिका, स्टँड अप कॉमेडी शोच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या विनोदाचा (Raju Passed Away) दर्जा हा चाहत्यांना भावला. त्यानं कधीही वैयक्तिक पातळीवर जावून कुणावर टिप्पणी केली नाही. बॉलीवूडमधील मोठमोठ्या सेलिब्रेटींशी त्याचे चांगले संबंध होते. बिग बी अमिताभ बच्चन हे त्याचे चाहते होते. त्याच्या जाण्यानं अनेकांनी त्याला आदरांजली वाहिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील राजूच्या जाण्यानं मोठा धक्का बसला आहे. त्यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजू हा नेहमीच आपल्या हदयात असेल. असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राजू हा दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही त्यांना त्याला बरं करण्यात यश आले नाही. चाहत्यांनी देखील राजूसाठी देव पाण्यात ठेवले होते. राजूच्या जाण्यानं मनोरंजन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
राजूनं आपल्या सगळ्यांचे जगणे आनंदी केले. त्याच्या विनोदानं मनोरंजन केले. त्याचा विनोद आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देणारा होता. त्या विनोदामध्ये एक सकारात्मकता होती. त्याच्या जाण्यानं मोठी हानी झाली असून तो नेहमीच आपल्या हदयात राहिल. अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे. राजूनं आपल्या विनोदानं कोट्यवधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. आता त्याच्या जाण्यानं त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राजूनं त्याच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वानं चाहत्यांना प्रभावित केलं होतं. त्याचा अंदाज वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यानं आपल्या प्रतिभेनं साऱ्यांना चकित करुन टाकलं होतं. असं शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राजू हा दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये 41 दिवसांपासून दाखल होता. शेवटपर्यत त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.