Rakhi Gulzar: दहा वर्षानंतर ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलझार यांचं मनोरंजन विश्वात कमबॅक, दिसणार 'या' सिनेमात

दहा वर्षानंतर राखी गुलझार मनोरंजन विश्वात कमबॅक करणार आहेत
rakhi gulzar comeback after 10 years in bengali film amar boss
rakhi gulzar comeback after 10 years in bengali film amar boss eSakal
Updated on

Rakhi Gulzar News: ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलझार या भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. राखी गुलझार यांनी आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

राखी गेल्या काही वर्षांपासुन अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीत. अशातच राखी यांच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. राखी तब्बल १० वर्षानंतर पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात कमबॅक करत आहेत.

(rakhi gulzar comeback after 10 years in bengali film amar boss)

rakhi gulzar comeback after 10 years in bengali film amar boss
Animal Bobby Deol: प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पाहून लॉर्ड बॉबी भारावला! ढसाढसा रडायलाच लागला, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडची दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार बंगाली चित्रपटाच्या माध्यमातुन कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. राखी लवकरच 'अमर बॉस' या चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमात नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी हे लोकप्रिय कलाकार देखील दिसणार आहेत. राखीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की.. बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये राखीचा शेवटचा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. राखीने रितुपर्णो घोषच्या 'शुभो मुहूर्त' नंतर कोणत्याही बंगाली चित्रपटात काम केले नाही.

काही काळापूर्वी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान राखीने तिच्या अभिनयाच्या निवडीबद्दल चर्चा केली होती. राखी म्हणाली होती की, "मी चित्रपटांमध्ये काम करायचे तेव्हा ते खूप वेगळे होते. मला सध्या काम मिळत नाही याबद्दल वाईट वाटत नाही. ज्या दिग्दर्शकांसोबत मी काम केले नाही त्यांच्यासोबत काम केल्याची मला कसलीही खंत नाही. तपन सिन्हा हा माझा आवडता दिग्दर्शक आहे, तो ज्या पद्धतीने सर्वांसाठी चित्रपट बनवतो ते मला आवडते. एक अभिनेत्री म्हणून माझाही असाच विश्वास आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.