गेल्या काही दिवसांपासुन राखी सावंत तिच्या लग्नावरुन जोरदार ड्रामा करत आहेत. यात आता आदिलही शांत बसणार नसल्याच दिसत आहे. राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी आता दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा करत आणि चाहत्यांची दिशाभूल करत आहेत.
मे 2022 मध्ये या जोडप्याने जानेवारी 2023 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यावेळी आदिलनेही ते मान्य करण्यास वेळ घेतला आणि त्यांनतर ते मान्य केलं. मात्र आता राखीने मीडियामध्ये येऊन आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला. तो दोन-तीन मुलींच्या संपर्कात असल्याचं म्हटलं. मग ती पुन्हा मिडियासमोर आली आणि म्हणाली की सर्व ठीक आहे. आता आदिल परत आला आहे. मात्र आता परत दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत.
आदिलची इंस्टा स्टोरीही चांगलीच व्हायरल झाली. त्यांनतर त्याने पापाराझींना सांगितले की, तो नेहमी राखीसोबत असतो. तो कुठे गेला? मी काय म्हणू शकतो राखी म्हणते ते सर्व खरं आहे. पापाराझीने त्यांला त्याच्या अफेअर बद्दलही विचारलं तेव्हा यावर आदिल म्हणाला, मीडियासमोर येवुन काय करु? मी राखीला चुकीचं म्हणायचं की स्वतःला चुकीचं सिद्ध करायचं. मला हे सर्व करण्याची गरज नाही, नाही का? याबाबत मला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मी काय बोलू राखी काहीही करू शकते. ती एक अबला स्त्री आहे, नाही का? ती एक शक्तिशाली महिला आहे.
आज, 5 फेब्रुवारीला ती पुन्हा इन्स्टा लाईव्हमध्ये रडताना दिसली. लाईव्हमध्ये तिने आदिलवर डबल गेम खेळल्याचा आरोप केला. नंतर तिने पुन्हा पापाराझींसमोर सांगितले की, मी आदिलवर खुप प्रेम करते मात्र आदिल तसं करत नाही. तो फक्त नाटकं करतोय. मी काल खुप खुश होते मात्र काल त्याची पोस्ट पाहिली. त्यानंतर मला काहीच कळत नाही आहे. आदिल मी पागल असल्याचं सांगतो. त्यानंतर तिने पुन्हा आदिलवर आरोप केले.
आता या दोघांमध्ये कोण खरं आणि कोणं खोटं बोलत आह हे तर त्यांनाच माहिती मात्र यामुळे नेटकरी या ड्रामा पाहुन नक्कीच कंटाळा आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.