Rakhi Sawant Mother Dies: आई गेली तरी राखीचा ड्रामा संपेना! नेटकऱ्यांनी अक्षरशः लाज काढली..

आईच्या निधनानंतरही राखीचा ड्रामा सुरूच असल्याने तिच्यावर सडकून टीका होत आहे..
Rakhi Sawant cries inconsolably after mother's demise, netizens said  drama band karo
Rakhi Sawant cries inconsolably after mother's demise, netizens said drama band karosakal
Updated on

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत हीच्या आईचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या तीन वर्षांपासून राखीची आई म्हणजेच जया भेडा यांना कर्करोगानं ग्रासलं होतं. पुढे त्यांना ब्रेन ट्यूमरचेही निदान झाले आणि प्रकृती अधिकच खालावली.

(Rakhi Sawant cries inconsolably after mother's demise, netizens said drama band karo)

अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. राखीनं स्वतः आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती दिली आहे.

राखीची आई गेल्याने सर्वच तिच्या दुःखात सहभागी झाले आहेत. पण तिच्या वागणुकीमुळे पुन्हा तिच्यावर टीका होत आहे. आई गेल्या नंतरही तीचा ड्रामा सुरूच असल्याने नेटकऱ्यांनी तिला अक्षरशः कमेंट मध्ये शिव्या दिल्या आहेत. आई गेली तरी तुझी नौटंकी थांबेना, अशा शब्दात तिला सुनावले आहे.

राखीच्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक व्हिडओ रुग्णालयातील आहे. तिच्या आईच्या निधनानंतर तिने हा व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये व्हेंटीलेटरवर असलेली तिची आई देखील दिसत आहे.

त्यामुळे आई जाऊनही अशा व्हिडिओ तु कशा करू शकते असा सवाल नेटकऱ्यांनी राखीला केला आहे. अशा प्रसंगात कोण व्हिडिओ बनवतं, तु बेशरम आहेस का, गेलेल्या आईसोबत व्हिडिओ करणं किती विक्षिप्त आहे अशा टीका नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

तर एका व्हिडिओ तिच्या आईचे शाब रुग्णालयातून बाहेर घेऊन जातानाचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये राखीने मेकप केलेला दिसतोय, डोळ्यांवर नकली भुवया,त्यावर रंग असा मेकप करून राखी तिथे आल्याचे दिसले.

त्यामुळे आई गेलेली असताना पण राखी मेकप करायला विसरली नाही, ही पक्की नौटंकी आहे, व्हिडिओ साठी काहीही करेल ही बाई अशा शब्दात तिला फटकारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.