Rakhi Sawant: 'जीव जातोय तरी फोन सुटेना', ओव्हरअ‍ॅक्टिंगमुळे राखी ट्रोल

नुकतेच राखीने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करत पोलिसात केस दाखल केली होती.
Rakhi Sawant
Rakhi SawantSakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या आयुष्यात ड्रामाचा अंत नाही. कधी लग्न, कधी घटस्फोट तर कधी पोलिस केस, राखी रोजच चर्चेत असते. ती अनेकदा मीडियासमोर आपली व्यथा मांडताना दिसते. नुकतेच राखीने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करत पोलिसात केस दाखल केली होती. दरम्यान, सोशल मीडियावरही राखीला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना राखी सावंत बेशुद्ध पडली. आदिलने अनेक मुलींसोबत गैरकृत्य केले आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे राखी मीडियाला बोलत असताना ती बेशुद्ध झाली आणि खाली पडली.

तिथे उपस्थित लोकांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि तिला पाणीही पाजले. यानंतर तिला कारमध्ये बसवले जाते आणि ती तिच्या घरी निघून जाते. तिचा व्हिडिओही समोर आला आहे.

Rakhi Sawant
Gautami Patil New Song : 'मी करते तुम्हाला मुजरा!' गौतमीचा कडक अंदाज

यादरम्यान लोकांचे लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे तिने आपला फोन सोडला नाही. लोकांचे म्हणणे आहे की राखी सावंतने बेशुद्धावस्थेत तिचा मोबाईल सोडला नाही. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, "फोन अजूनही तिच्या हातात आहे." एकजण म्हणाला, "चक्कर आली पण मॅडमने फोन सोडला नाही."

एकजण म्हणाला, "हाय व्होल्टेज डे नाही तर हाय व्होल्टेज ड्रामा आहे." एका यूजरने म्हटले की, "बेहोश होऊनही आयफोन सोडला नाही." एका यूजरने सांगितले की, मोबाईल नाही पडला. ही पूर्ण नौटंकी आहे."

राखी सावंतने आदल्या दिवशी आदिल खानवर मारहाणीचा आरोप करत पोलिसात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आदिलला ताब्यात घेण्यात आले होते. राखीने मीडियाशी संवाद साधत पुन्हा पतीवर मारहाणीचा आरोप केला.

पोलिस कोठडीपूर्वी आदिल हा तिला मारण्यासाठी घरात आला होता, असे तिने सांगितले. यापूर्वी राखीने आदिलवर फसवणुकीचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.