अभिनेत्री राखी सावंत हीच्या आईचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या तीन वर्षांपासून राखीची आई म्हणजेच जया भेडा यांना कर्करोगानं ग्रासलं होतं. पुढे त्यांना ब्रेन ट्यूमरचेही निदान झाले आणि प्रकृती अधिकच खालावली.
अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. राखीनं स्वतः आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती दिली आहे.
आईच्या निधनानंतर राखी सावंत सातत्याने एकच गोष्ट बोलत होती ते म्हणजे आई शिवाय माझं कुणीच नाही, आई गेली.. आता मी अनाथ झाले. किंबहुना या आधीही राखी अनेकदा हेच म्हणाली आहे, की या जगात आईशिवाय तिचं कुणीच नाही.
पण खरच ते सत्य आहे का? राखीचं या जगात कुणीच नाही का? तिला परिवार नाही का? त्याच विषयी आज थोडक्यात जाणून घेऊया.. नेमकं राखीच्या कुटुंबात कोण कोण आहे..
(Rakhi Sawant family mother jaya bheda father anand sawant brother sister and relatives details)
राखीचे मूळ नाव नीरू भेडा असे आहे. राखीची आई गुजराती होती, तिचे नाव जया भेडा. राखीच्या खऱ्या वडिलांचे नाव माहीत नाही. पण तिची आई जया भेडा यांनी कॉन्स्टेबल आनंद सावंत यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यानंतर राखीला दुसऱ्या वडिलांचे आडनाव मिळाले आणि नीरुची राखी सावंत झाली.
राखीच्या वडिलांचे म्हणजे आनंद सावंत यांचे २०१२ मध्ये निधन झालं. राखीच्या वडिलांनी सुरुवातीला या क्षेत्रात येताना तिला खूप विरोध केला असं राखी सांगते पण राखीच्या वडिलांचा एकही फोटो अद्याप पाहायला मिळालेला नाहीय.
असं म्हणतात, राखी सावंतचा एक भाऊ आहे. राकेश सावंत असं त्याचं नाव असून तोही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. राखीला एक बहीणसुद्धा आहे. जिचं नाव उषा सावंत असं आहे. परंतु राखी आपल्या भावंडांसोबतही कधी दिसत नाही. याशिवाय राखी अभिनेता सलमान खानला भाऊ मानते.
बाकी राखी आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा ही होतच असते. आजवर राखी सोबत अनेकांची नावं जोडली गेली आहेत. त्यापैकी राखीने रितेश सिंग ही सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव. रितेश आणि राखी 2019 पासून एकत्र होते. 2022 मध्ये ते विभक्त झाले. तर राखी सध्या आदिल खान दुर्रानीसोबत आहे. नुकतेच त्यांनी लग्न केल्याचेही स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.