Rakhi Sawant Umrah: राखी नाही तर फातिमा म्हणा! इस्लाम स्वीकारल्यानंतर राखी गेली मक्का-मदिनाला...

Rakhi Sawant Umrah:
Rakhi Sawant Umrah:Esakal
Updated on

Rakhi Sawant In Burqa: ड्रामा क्विन राखी सावंत हिची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तिचा पती आदिल खान जेव्हा पासून तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याने राखीवर आता पलटवार केला आहे. त्याने तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. राखी विरोधात त्याच्याकडे अनेक पुरावे असल्याचंही त्याने सांगितलं आहे.

Rakhi Sawant Umrah:
Shah Rukh Khan: "माझीच बायको मला...", शाहरुखचं चाहत्यांसोबत #AskSRK सेशन! प्रश्नाचे दिले भन्नाट उत्तर...

तर राखीने देखील आदिलवर पुन्हा आरोप लावले. आता या आरोप प्रत्यारोपाच्या सामन्यादरम्यान राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे. आदिलसोबत लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्विकारला होता आणि तिचे नाव बदलून फातिमा ठेवले होते.

राखीने तिच्या प्रवासाला सुरुवात करतांना एक फ्लाइटचा व्हिडिओ देखील शेयर केला त्यात तिने हिजाब घातलेला होता. ती उमराहला जात असल्याचं तिने सांगितलं होतं. आता पुन्हा राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rakhi Sawant Umrah:
Dharmaveer2: आनंद दिघे स्मृतीदिनानिमित्त धर्मवीर 2 ची ठाणे टेंभी नाक्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठी घोषणा..

इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उमराह करणाऱ्या राखी सावंतच्या या व्हायरल व्हिडिओत तिला तिच्या चाहत्यांनी घेरले आहे. मदिनामध्ये राखी सावंतने बुरखा घातला आहे ती चाहत्यांसोबत फोटो काढत आहे. जेव्हा काही फॅन तिला राखी म्हणतात, तेव्हा तिने तिला राखी नाही तर फातिमा म्हणा असं आवहन चाहत्यांना केल आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत ती अल्लाहसमोर प्रार्थना करताना दिसत आहे.

सध्या तिचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. एकानं कमेंट करत लिहिलं की, 'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज' तर दुसऱ्याने लिहिलंय की, 'अगं राखी नाटक बंद कर' तर एकानं तिला ओव्हरअॅक्टिंग न करण्याचा सल्ला केला. तर काहींनी ती धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप तिच्यावर लावला आहे.

Rakhi Sawant Umrah:
Priyadarshini Indalkar: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनीचा मोठा 'कार'नामा! कुटुंबात नवा पाहुणा

राखीने पती आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यामुळे इस्लाम धर्म स्वीकारला होता. मे 2022 मध्ये तिने आदिलशी गुपचूप लग्न केले. निकाहची घोषणा झाल्यानंतर दोघांमध्ये अनेक मतभेद झाले. तिने आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता सहा महिन्यानंतर आदिल तुरूंगातुन बाहेर आला आहे. मात्र आता दोघांमध्येही अनेक वाद विवाद सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.