Rakul Preet Singh: 'मला कमी वेळात लांबचा पल्ला गाठायचा होता' म्हणून...

Rakul Preet Singh
Rakul Preet Singhesakal
Updated on

दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये आपल्या आभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्रीमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचा सामावेश आहे. तिच्या फॅशनची चर्चा नेहमीच असते. रकुलचे सध्या 'डॉक्टर जी' आणि ‘थॅक गॉड’ हे चित्रपटामुळे व्यस्त आहे . तिचा 'डॉक्टर जी' या चित्रपटाला समिंश्र प्रतिक्रिया मिळाल्यात आणि आता ती ‘थॅक गॉड’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. तिच्या या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिची मुलाखत घेण्यात आली,यावेळी तिने तिच्या करियरबद्दल सांगितलं.

Rakul Preet Singh
Vaishali Takkar suicide : वैशालीचा आरोपी राहुल नवलानीविषयी धक्कादायक माहिती उघड...

शैक्षणिक जीवनात चांगली कामगीरी करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रकुलच्याही नावाचा उल्लेख होतो. तिने दिल्ली विद्यापीठातून गणित विषयातुन पदवी घेतली आहे. मात्र रकुलने त्याक्षेत्रात पुढे करियर न करता अभिनय क्षेत्र निवडले.याबाबत तिला विचारलं असता ती म्हणाली, ‘मी गणिताची पदवीधर आहे, परंतु मला फक्त तेव्हा इतंकच माहित होते की मला काहीतरी वेगळे करायचे आहे. मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मला आई-वडील विचारायचे, 'तू मोठी झाल्यावर काय करशील?' आणि तेव्हा मी नेहमी म्हणायचे, 'मी काय होणार आहे हे मला माहीत नाही, पण मी डॉक्टर किंवा इंजिनिअर होणार नाही.’

Rakul Preet Singh
Thank God: पॅन्ट शर्टातील श्रीकृष्ण चालतो मग सूटाबुटातील चित्रगृप्त का नाही ?

पुढे ती सांगतेय की, मला याबद्दल खूप खात्री होती. मी विज्ञानाचा अभ्यास केला आणि नंतर मी गणितात पदवी घेतली, तरी मला काहीतरी वेगळे करायचं होते. मला शक्यतो कमी वेळात जास्त लांबचा पल्ला गाठायचा होता. माझ्या वर्गातल्या प्रत्येकाला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं. पण माझ्या डोक्यात एकच फिक्स होत की मला काहितरी वेगळ करायचं होतं’.

Rakul Preet Singh
Vaishali Takkar suicide : वैशालीचा आरोपी राहुल नवलानीविषयी धक्कादायक माहिती उघड...

रकुल पुढे म्हणते की, ' तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये ती एक ऑलराऊंडर विद्यार्थी होती. तीने अभ्यास आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली'. तिने राष्ट्रीय स्तरावर गोल्फ खेळले आहे. तिने सक्रिय खेळाडू म्हणूनही काम केले आहे. ती म्हणते, “खरं तर मी शिकत असतांनाच मॉडेलिंगही सुरू केलं होतं ,त्यामुळे अर्धा दिवस मी कॉलेजमध्ये माझ्या क्लासेस करायचे आणि नंतर अर्धा दिवस मी माझ्या मॉडेलिंग असाइनमेंटमध्ये बिझी असायची. मी मॉडेलिंग करत होते आणि त्यावेळीच गणिताचा अभ्यासही करत होते. कॉलेज फेस्टिव्हलमध्येही मी सक्रिय सहभाग घेतला होता'. रकुलला लहानपणापासूनच काय करायचे होते हे माहित होतं आणि तिने मेहनत घेतली. मेहनतीच्या जोरावर तिने अभिनय क्षेत्रात वेगळीचं ओळख निर्माण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()