Lata Mangeshkar Ram Aayenge AI Song : भारताच्या गानकोकिळा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या लता मंगेशकर यांच्या आवाजाची (Lata Mangeshkar Latest News) महती साऱ्या जगभर पसरलेली आहे. त्यांच्या निधनानं भारतीय संगीतविश्वाची मोठी हानी झाली. या सगळ्यात एआयन लता दीदींच्या आवाजात राम आयेंगे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला (Ram Aayenge Song) असून त्यातून दीदींना आदरांजली वाहिली आहे.
संबंधित एआय वापरकर्त्यांनं दीदींच्या आवाजातील तो ऑडिओ युट्युबवर (AI Related News) प्रदर्शित केला आहे. त्यानं म्हटल आहे की, हा नॉन कर्मिशियल व्हिडिओ आहे. एआय आणि साऊंड इंजिनिअरींगच्या मदतीनं आपण हा ऑडिओ तयार केल्याचे त्याचे म्हणणे आहे. यात संबंधित गायक, संगीतकार, यांचा आदर ठेवूनच ही कृती करण्यात आली आहे. यातून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवण्याचा उद्देश नाही. असे त्या मेकर्सनं स्पष्ट केलं आहे.
राम आयेंगे हे मुळ गाणं प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रानं गायलं आहे. तिच्या (Swati Mishra News) त्या गाण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं होतं. (Narendra Modi Latest News) त्यांनी खास पोस्ट शेयर करत स्वातीवर कौतुकाचा वर्षाव केला होता.तसेच तिला राम मंदिराच्या उद्घघाटन सोहळ्याचे निमंत्रणही दिले होते. यानंतर मोदींनी वेगवेगळ्या गायकांचे आभार मानत त्यांचे कौतुक करत त्यांना राम मंदिराच्या सोहळ्याला निमंत्रित केले होते.
या सगळ्यात पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्याप्रती एक पोस्ट शेयर करुन त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला होता. सारा देश २२ तारखेला राम मंदिराच्या उद्घघाटन सोहळ्याच्या उत्साहात असेल. मात्र या सोहळ्याला लता दीदी नसतील याची खंत आहे. त्या आपल्यात नाहीत. अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. लता दीदींचे दोन वर्षांपूर्वी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले होते.
राम मंदिराच्या उद्घघाटन सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली असून मुख्य कार्यक्रमाची सगळ्यांना कमालीची उत्सुकता आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सोहळ्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. आता तो क्षण जवळ आला आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलविण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, अजय देवगण ते कंगना रनौतपर्यत अनेकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात साऊथच्या सेलिब्रेटींनी देखील बोलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिराचे उद्घघाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.