Ram Charan: मुलगी झाली हो! लग्नानंतर ११ वर्षांनी अभिनेता रामचरण आणि उपासना झाले आई- बाबा..

कन्यारत्न झाल्याने रामचरण आणि उपासनाचा आनंद गगनात मावेना..
Ram Charan and Upasana welcome baby girl
Ram Charan and Upasana welcome baby girlsakal
Updated on

Ram Charan and Upasana : 'आरआरआर' फेम दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आज बाबा झाला आहे. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांना कन्यारत्न झाले आहे. उपासनाने आज, मंगळवार, २० जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

लग्नाच्या जवळपास ११ वर्षांनी राम आणि उपासना आई-बाबा झाले आहेत. सोमवारी रात्री उपासनाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, आणि आज तिनं एका गोड बाळाला जन्म दिलं. ही आनंदाची सध्या वाऱ्यासारखी पसरत असून, चाहते राम व उपासनावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

(Ram Charan and Upasana welcome baby girl)

हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अपोलो हॉस्टिपटमध्ये उपासनाला दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करत राम व उपासना यांना मुलगी झाल्याची अधिकृत माहिती दिली.

Ram Charan and Upasana welcome baby girl
Ashadhi Wari: वारी विठ्ठालाची मग गजर 'ज्ञानबा- तुकारामा'चा का? काय आहे ही प्रथा..

अभिनेता राम चरणने बाळाच्या जन्माच्या काही तास आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने संगीतकार कालभैरवने त्यांच्या बाळासाठी बनवलेली एक ट्यून शेअर केली होती. आणि अवघ्या काही तासातच ही आनंदाची बातमी मिळाली.

(Ram Charan and Upasana welcome baby girl)

राम आणि उपासना १४ जून २०१२ रोजी विवाहबंधनात अडकले. ५ दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतर ११ वर्षांनी मुलगी झाल्याने त्यांच्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे. शिवाय चाहतेही बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहे.

यानिमित्ताने साऊथचे ज्येष्ठ अभिनेत चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा आजी-आजोबा झाले आहेत. सोशल मीडियावरही 'अभिनंदन अण्णा' म्हणत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()