Oscar 2023: आरआरआरची संपूर्ण टीम लॉस एंजेलिसला आपल्या मनात समस्त भारतवासियांचे प्रेम सोबत घेऊन गेली होती. अभिनेता रामचरणने एका व्हिडीओत याची झलक दाखवली आहे.
रामचरण आणि त्याची वाईफ उपासनानं सांगितलं की ते जिथे जातात तिथे त्यांच्यासोबत मंदीर सोबत घेऊन जातात.यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. ऑस्कर सोहळ्याआधी ते दोघे आपल्या आराध्य देवतांसमोर हात जोडून नतमस्तक झाले.
त्यांच्या या व्हिडीओला पाहून चाहत्यांना मात्र त्या दोघांचा खूप अभिमान वाटत आहे. त्यांनी सोहळ्याला जाण्याआधीच्या तयारीची देखील एक झलक लोकांना दाखवली. (Ram charan reveals he and wife upadana always set up a temple whereever they go due to this reason)
राम चरणचा हा व्हिडीओ वॅनिटी फेयर मॅगझिनसाठी दिला गेला आहे. यामध्ये पाहू शकता की ऑस्कर्ससाठी दोघंही कसे आपल्या लॉस एंजेलिसमधील घरात तयार होत आहेत. त्यांनी हे देखील दाखवलं की ते कुठेही जातात तेव्हा आपल्यासोबत वॉल टेंपल सोबत ठेवतात.
रामचरण म्हणाला की,'' कुठेही मी जातो तेव्हा मी आणि माझी पत्नी टेंपल सेटअप सोबत ठेवतो. त्यांनी सांगितलं की ते दिवसाची सुरुवात 'धन्यवाद' या शब्दानं करतात आणि अशा व्यक्तींचे नेहमी आभार मानतात ज्यांच्यामुळे ते यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत''.
हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
युट्युबवर शेअर केलेल्या रामचरणच्या या व्हिडीओची लोक खूप प्रशंसा करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये उपासना आपल्या टीमला विचारताना दिसते की,' तिचा मेकअप वॉटरप्रूफ आहे ना'.
त्यावर तिचे मेकअप आर्टिस्ट मस्करीत बोलताना दिसतात की,'का तुला रडायचं आहे?'
यावर उपासना बोलते,''जर जिंकलो तर रडू ना''.
माहितीसाठी इथं सांगतो की आरआरआर मधील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.