Natu Natu Video: 'नाटू नाटू' च्या यशानंतर राम चरणच्या सासूचा रस्त्यावर भन्नाट डान्स...व्हिडिओ व्हायरल

RRR viral video
Natu Natu Video
RRR viral video Natu Natu VideoEsakal
Updated on

सध्या भारतासह जगातही RRR च्या 'नाटू नाटू' या गाण्याची चर्चा आहे. या गाण्याने 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स'मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्यासाठी आवार्ड पटकावला. त्यानंतर भारताची मान अभिमानाने उंचावली.

बॉलिवूड कलाकारांसह सर्वांनीच एसएस राजामौली आणि पुर्ण टिमचं कौतुक केलं.यातच अभिनेता राम चरणच्या सासूबाईनींही आपल्या जावयाचं अभिनंदन करण्यासाठी 'नाटू नाटू' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

RRR viral video
Natu Natu Video
RRR Natu Natu Won Golden Globe : गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर राजामौलींची पहिलीच प्रतिक्रिया, 'आज मला..'

वास्तविक, राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला आहे, जिची आई शोभना स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर 'नाटू नाटू'वर नाचताना दिसत आहे. राम चरणच्या सासूचं पूर्ण नाव शोभना कंमिननी आहे. त्या अपोलो हॉस्पिटलच्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या स्वित्झर्लंडला आल्या होत्या.

RRR viral video
Natu Natu Video
Mahesh Bhatt: ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, मात्र आता प्रकृती...

शोभना कामिनेनी यांचा व्हिडिओ मुलगी उपासना हिने रिट्विट केला आहे. त्या क्लिपमध्ये राम चरणची सासू नाचतांना आहे. गाणं गात गात त्यांनी जोरदार डान्स केला आहे.

RRR viral video
Natu Natu Video
SS Rajamouli: मी भारतातला हुकूमशहा पण... ' राजामौली पाहतोय हॉलिवूडचं स्वप्न

आईचा हा भन्नाट व्हिडिओ शेअर करत उपासनाने लिहिलयं सासूला दावोसमधील नाटू नाटूचा खूप अभिमान आहे. लव्ह यू आई शोभना. यानंतर लोकांनीही कमेंट करायला सुरुवात केली. काहींनी तिचे अभिनंदन केले तर कोणी तिला सुपर अम्मा म्हंटलयं. इतकच नाही तर कोणी तिला उपासनाची लहानी बहीण म्हणतय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com