Ram Gopal Varma bollywood Dengerous movie controversy: बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये राम गोपाल वर्माचे नाव घेतले जाते. मात्र हा दिग्दर्शक कायम त्याच्या वादामुळे चर्चेत असतो. त्यानं आतापर्यत दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.रंगीला पासून ते सरकार पर्यत....ही यादी मोठी आहे. पण राम गोपाल वर्माच्या भोवती फिरत असलेला वाद यामुळे तो आणखी ट्रोल होताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर राम गोपाल वर्माचा त्याच्याच डेंजरस चित्रपटातील अभिनेत्रीचे पाय चाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्यावर टीकेचा वर्षाव होतो आहे. नेटकऱ्यांनी त्याला बोलताना कोणताही मुलाहिजा ठेवलेला नाही. एवढा मोठा दिग्दर्शक अशाप्रकारचे वर्तन कसे काय करु शकतो असा प्रश्न त्यांनी यानिमित्तानं केला आहे. असं करणं हे त्याला शोभतं का, बॉलीवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्यांना घेऊन लोकप्रिय चित्रपट देणारा दिग्दर्शक एवढा आंबटशौकीन कसा काय झाला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
वास्तविक राम गोपाल वर्माच्या बाबत हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. त्यानं प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्तावर केलेली कमेंट ही त्यावेळी व्हायरल झाली होती. तनुश्रीनं तिच्यावर झालेल्या मी टू आऱोपांनी बॉलीवूडला हादरवून सोडले होते. प्रख्यात अभिनेते नाना पाटेकरांवर तिनं हे आरोप केले होते. तेव्हा राम गोपाल वर्मानं तनुश्रीवर दिलेली प्रतिक्रिया वादात सापडली होती. तनुश्रीनं काही गोष्टी या जाणीवपूर्वक केल्या आहेत. आपण चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात यावं हा तिचा उद्देश असल्याचे वर्मानं म्हटले होते.
राम गोपाल वर्मा हा त्याच्या अंतरा माळीबरोबरच्या फोटोशुटमुळे देखील चर्चेत आला होता. ते फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आपला तऱ्हेवाईकपणा आणि त्याचा अतरंगी स्वभाव याचा फटका त्याला बसल्याचे दिसून आले आहे. रंगीला, सत्या, कंपनी, सरकार, सरकार राज, यासारखे सरस चित्रपट बॉलीवूडला देणाऱ्या दिग्दर्शकानं आता त्याच्या डेंजरस नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क अभिनेत्रीचे पाय चाटले आहे. त्या अभिनेत्रीनं देखील त्या व्हिडिओवर कमेंट देताना आपल्यासाठी हा मोठा सन्मानच होता. असे म्हटले आहे.
सोशल मीडियावर सध्या राम गोपाल वर्मावर नेटकरी तुटून पडले आहे. चित्रपट चालावा, तो चर्चेत यावा, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यत पोहचावा यासाठी दिग्दर्शक, कलाकार वाद क्रिएट करतात हे आता काही नवीन राहिले नाही. मात्र त्यासाठी आपली पातळी सोडणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे. अशा या आंबटशौकीन दिग्दर्शकांचा डेंजरस चित्रपट कसा असेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.