Ram Gopal Varma : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. आपल्या परखड वक्तव्यांसासाठी ओळखल्या गेलेल्या राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटांचा चाहतावर्गही मोठा असल्याचे दिसून आले आहे.
सध्या राम गोपाल वर्मा यांच्या व्युह्मम नावाच्या चित्रपटावरुन मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय व्यक्तिवर बेतलेल्या या चित्रपटावरुन वर्मा यांनी पोलिसांकडे देखील तक्रार केल्याचे बोलले जात आहे. इंडिया डॉट कॉमनं या बाबत सविस्तर रिपोर्ट दिला आहे. त्यामध्ये या चित्रपटाचा विषय आणि त्यावरुन झालेला वाद यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
नेमका आरोप काय आहे?
आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, चित्रपट निर्मात्यानं असा आरोप केला आहे की, तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) आणि त्याचे सर्वेसर्वा एन.चंद्राबाबू नायडू यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न त्या चित्रपटातून करण्यात आला आहे. या सगळ्यात अमरावती जॉइंट अॅक्शन कमिटी (जेएसी) चे नेता श्रीनिवास राव यांनी म्हटले आहे की, राम गोपाल वर्मा यांचा हा चित्रपट आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या समर्थनार्थ आहे.
चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार?
खरं तर वर्मा यांनी यापूर्वी हैद्राबाद मधील आपल्या कार्यालयाबाहेर ज्यांनी व्यूहम चित्रपटाचा विरोध केला त्यांच्यावर टीका केली होती. त्यात चंद्राबाबू नायडू आणि टीडीपी एमएलसी नारा लोकेश आणि जनसेना पार्टीचे अध्यक्ष आणि अभिनेता पवन कल्याण यांच्यावर टीका केली होती. यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी वर्मा यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनंही केली होती. त्यात वर्मा यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले होते.
असं म्हटलं जात आहे की, हा चित्रपट आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करणारा आहे. त्यातून नायडू यांची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. असा आरोप वर्मा यांच्या व्यूहम या चित्रपटावर करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या या चित्रपटावरुन तेलंगाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.