Ram Gopal Verma Lok Sabha Chunav 2024: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा हे नेहमीच चर्चेत असणारे कलाकार आहेत. कधी आपल्याच चित्रपटातील अभिनेत्रीसोबत नको तो व्हिडिओ पोस्ट करणे तर कधी एखाद्या चित्रपटावर टोकाची प्रतिक्रिया देणे यामुळे राम गोपाल वर्मा हे चर्चेत असतात.
राम गोपाल वर्मा यांनी आता आपल्या राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. ते आंध्र प्रदेशातील पीठापूरममधून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा अभिनेता पवन कल्याणने तिथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा वर्मा यांनी देखील आपल्या नावाची घोषणा केली.
राम गोपाल वर्मा यांनी ते नेमक्या कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहेत ते सांगितले नाही. २०२२ मध्ये राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटावर चर्चा करण्यासाठी जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी असं बोललं जात होतं की, ते २०२४च्या लोकसभा निवडणूकीची तयारी करत आहेत. दरम्यान त्यांनी दोन चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. २०१९ मध्ये वायएसआर कॉग्रेसच्या विजयात देखील त्यांचे योगदान महत्वाचे होते.
राम गोपाल वर्मा यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटले आहे की, अचानक झालेल्या या निर्णयावर मी तर खूप आनंदी आहे. मला हे तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे की, मी पीठापूरम म्हणून निवडणूक लढवणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.