'खूश राहायचं असेल तर लग्नच करू नका'; घटस्फोटाबाबत राम गोपाल वर्मा यांचा सल्ला

'प्रेमाला सर्वांत जलद गतीने मारून टाकणारी गोष्ट म्हणजे लग्न.'
Dhanush Aishwarya and RGV
Dhanush Aishwarya and RGV
Updated on

दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth) यांनी १८ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. धनुष-ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सर्वांना याबद्दलची माहिती दिली. एकीकडे चाहत्यांना हा मोठा धक्का असतानाच दुसरीकडे निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी घटस्फोटाबाबत ट्विट्स करत तरुणांना लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. 'लग्नाच्या धोक्यांबद्दल तरुणांना सावध करण्यासाठी सेलिब्रिटींचा घटस्फोट हा चांगला ट्रेंडसेटर आहे,' असं अजब ट्विट त्यांनी केलं आहे. (Divorce)

राम गोपाल वर्मा यांचे ट्विट्स-

'प्रेमाला सर्वांत जलद गतीने मारून टाकणारी गोष्ट म्हणजे लग्न. आनंदी राहण्यामागचं गुपित म्हणजे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत प्रेम करत राहा आणि आयुष्यात पुढे निघून जा. लग्नासारख्या तुरुंगात जाण्यापेक्षा हा मार्ग चांगला आहे', असं ते एका ट्विटमध्ये म्हणाले. वैवाहिक जीवनातील प्रेम ते साजरा केलेल्या दिवसांपेक्षा कमी दिवस टिकतं, जे तीन ते पाचच दिवस असतं. हुशार लोकं प्रेम करतात आणि मूर्ख लोक लग्न करतात, असंही त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

इतकंच नव्हे तर घटस्फोट धूमधडाक्यात साजरा करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. 'नाचगाण्याने घटस्फोटाचा आनंद साजरा केला पाहिजे, कारण त्यानंतर नात्यातून मुक्ती मिळते. लग्न मात्र एकमेकांच्या धोकादायक गुणांची चाचपणी करताना कोणताही गाजावाजा न करता केलं पाहिजे,' असं ते म्हणाले. लग्नसंस्थेवर टीका करत त्यांनी पुढे लिहिलं, 'दु:ख आणि दु:खाचं सतत चक्र चालू ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी समाजावर टाकलेली ही सर्वात वाईट प्रथा म्हणजे विवाह.'

Dhanush Aishwarya and RGV
'त्या' एका अफवेमुळे धनुष झाला होता रजनीकांत यांचा जावई

घटस्फोटाबाबत धनुषची पोस्ट-

''मैत्री, जोडीदार, एकमेकांचे हितचिंतक आणि पालक म्हणून १८ वर्षे पूर्ण केली. अनेक चढउतारांच्या या प्रवासात आज आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथून आम्हाला वेगवेगळे मार्ग निवडायचे आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून एकमेकांना समजून घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. आमच्या या निर्णयाचा सन्मान करा आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आवश्यक तेवढा खासगी वेळ द्या,'' अशी पोस्ट धनुषने लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.