'Sexy मुलीचं अंगप्रदर्शन चालतं,मग मुलाचं का नाही? रणवीरच्या पाठीशी रामू

बॉलीवूडमधनं अनेकांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूट करण्याच्या धाडसाला पाठिंबा दिला आहे.
Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshoot
Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshootGoogle
Updated on

रणवीर सिंगच्या(Ranveer Singh) न्यूडफोटोशूटमुळे(Nude Photoshoot) सुरु झालेलं वादाचं वादळ थांबायचं काही नाव घेत नाही. जेव्हापासून अभिनेत्यानं न्यूड फोटो पोस्ट केलेत अगदी त्या क्षणापासून काही जणांनी त्याची प्रशंसा केलीय तर काहीजण अगदी चांगलंच तोंडसुख घेताना दिसत आहेत. पण बॉलीवूडमधनं अनेकांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूट करण्याच्या धाडसाला पाठिंबा दिला आहे. (Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshoot)

Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshoot
Shivam Sharma चे आईच्या मैत्रिणीसोबतच होते संबंध, पास्ता घेऊन जायचा आणि...

आता नेहमीच अनेक विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडणाऱ्या राम गोपाल वर्मांनी(Ram Gopal Varma) देखील रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. 'लडकी' या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमामुळे राम गोपाल वर्मा सध्या चर्चेत होते. कारण त्यांच्या या सिनेमाची निर्मिती ही भारत आणि चीनने मिळून केली होती. मार्शल आर्ट्सवर आधारित या सिनेमात एक स्त्री व्यक्तीरेखा मध्यवर्ती भूमिकेत होती. ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की हे उत्तम उदाहरण आहे,स्त्री-पुरुष, समानतेचं.

Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshoot
Timepass 3- हृताचं चाहत्यांना थंडगार कोल्ड्रिंक चॅलेंज,काय आहे बरं ते...

एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना राम गोपाल वर्मा म्हणाले की,तसं पाहिलं तर हा स्त्री-पुरुष समानतेशी खूप संबंधित मुद्दा आहे. जर स्त्री आपल्या सेक्सी शरीराला लोकांसमोर उघडपणे दाखवू शकते तर मग पुरुष का नाही? ही खूप दांभिक विचारप्रवृत्ती आहे की पुरुषांना न्यूड फोटोशूट केल्यावर खूप वेगळे नियम लावले जातात. पुरुषांना देखील स्त्रियांप्रमाणे समान हक्क असायला हवा याबाबतीतही.

Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshoot
Hijab: 'याच कारणानं मी हिजाबचा स्विकार केला', अखेर सना खानने सोडलं मौन

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या सिनेमांच्या बाबतीत अनेकदा रिस्क घेतली आहे. क्लायमॅक्स आणि नेकेड असे बोल्ड कथानकांचे सिनेमे करुन अॅडल्ट सिनेमे बनवणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत राम गोपाल वर्मा याधीच पोहोचले आहेत. रणवीरच्या न्यूड फोटोशूटविषयी बोलताना पुढे ते म्हणाले,''मला वाटतं आता भारत अनेक बाबतीत खुप पुढे गेलाय, पुढारला आहे. त्यामुळे रणवीरचा विषय येतो तिथे स्त्री-पुरुष समानतेचा विचार व्हायलाच हवा''.

Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshoot
Nude Photoshoot मुळे रणवीर गोत्यात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

राम गोपाल वर्मा यांच्याआधी रणवीरची खास मैत्रिण अभिनेत्री आलिया भट्टने देखील अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे. आणि लोकांना दरडावलं आहे की,त्याला कोणी काही बोललं तर मला आवडणार नाही. तो माझा आवडता अभिनेता आहे, त्याने खूप चांगले सिनेमे केलेयत, त्याच्याबद्दल नकारात्मक मी खपवून घेणार नाही. रणवीरचा इंडस्ट्रीतला चांगला मित्र म्हणून ओळखला जाणारा अर्जुन कपूरनेही रणवीरच्या या बोल्ड निर्णयाचं स्वागत केलं आहे. तो म्हणाला होता,त्याला ही गोष्ट जर आनंद मिळवून देत असेल तर आपणही त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा.

Ram Gopal Varma on Ranveer Singh's controversial photoshoot
Bharti Singh च्या बाळाचा नवा फोटो नेटकऱ्यांना खटकला;म्हणाले,'हे योग्य नाही'

तर आपल्या लक्षात आलं असेल एव्हाना की राम गोपाल वर्मा यांनी देखील रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूट निर्णयाला पाठिंबा देत म्हटलं आहे, रणवीरनं खूप वेगळा प्रयत्न केला आहे. जे सुपरस्टारच्या व्यक्तिमत्त्वाइतकं अद्वितीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.