Ramayan Serial : 'जगात सर्वाधिक...!' रामायण मालिकेच्या नावावरील 'तो' रेकॉर्ड अजुनही कायम

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची लोकप्रियता तेव्हा जगात सर्वाधिक होती.अजुनही या मालिकेशी संबंधित असणारे विक्रम अबाधितच असल्याचे दिसून आले आहे.
Ramayan Collection
Ramayan Collection esakal
Updated on

Ramayan Collection : भारतामध्ये आजवर ज्या मालिका प्रसारित झाल्या त्या सर्वाधिक चर्चा झाली ती रामानंद सागर निर्मित रामायण या मालिकेची. त्यांनीच पुढे महाभारत, कृष्णा मालिकेचीही निर्मिती केली. पण रामायणा सारख्या विषयावर मालिकेची निर्मिती करुन त्यांनी भारतीय संस्कृती आणि मनोरंजन विश्वात मोलाची भर घातली आहे.

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची लोकप्रियता तेव्हा जगात सर्वाधिक होती.अजुनही या मालिकेशी संबंधित असणारे विक्रम अबाधितच असल्याचे दिसून आले आहे. म्हणून तर रामायण मालिकेला जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी लोकप्रियता अन्य कोणत्याही भारतीय मालिकेला मिळालेली नाही. या मालिकेत भगवान राम यांची भूमिका करणारे अरुण गोविल, सीता यांची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्या भूमिका अजरामर झाल्या.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

रामायण मालिकेची निर्मिती केल्यानंतर निर्मात्यांची मोठी कमाई तर झालीच मात्र त्यांनी या मालिकेचा प्रत्येक भाग चित्रित करण्यासाठी केलेला लाखोंचा खर्च याकडे कुणाचे लक्ष जात नाही. त्यासाठी रामानंद सागर यांनी प्रचंड खर्च केला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामायण मालिकेच्या एका भागाचे शुट करण्यासाठीचा खर्च त्यावेळी ९ लाख रुपये एवढा होता. एकुण सात कोटींमध्ये तयार झालेल्या ७८ भागांमधून ३१.४कोटींटी कमाई झाली होती.

Ramayan Collection
Ramayan serial: 'तुम्हाला माता सीता समजायचो तू पातळी सोडली...' दीपिकावर नेटकऱ्यांचा संताप!

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेनं केवळ भारतातच नाही तर जगात मोठा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. भारताशिवाय आणखी ५५ देशांमध्ये या मालिकेचे प्रसारण होत होते. त्यावेळी या मालिकेला ६५० मिलियन प्रेक्षकांची व्ह्युअरशिप मिळाली होती. रामानंद सागर यांच्या त्या रामायण मालिकेचे रेकॉर्ड अजुनही कुणी ब्रेक केलेले नाही. यात आणखी गंमतीची गोष्ट म्हणजे, १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेचे अजुनही खूप चाहते आहेत.

Ramayan Collection
Kajol : काजोल एवढी सुंदर दिसते!

कोरोनाच्या काळात देखील या मालिकेचे पुनप्रसारण करण्यात आले होते. त्यावेळी त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे. तेव्हा भारतातील ७.७ कोटी प्रेक्षकांनी ही मालिका पुन्हा पाहण्याचा आनंद घेतला होता. त्यानंतर जगात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका म्हणून या मालिकेनं आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावर केल्याचे दिसून आले.

Ramayan Collection
Ramayan Collection
Ramayan Collection
Nora Fatehi : साजुक तुपातलं सौंदर्य!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.