Hanuman Movie : जेवढी तिकीटं विकली जातील तेवढे पैसे राम मंदिरासाठी देणार दान! साऊथच्या सुपरस्टार्सची घोषणा

हनुमानच्या प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर सध्या त्याचे जोरदार प्रमोशनही सुरु केले आहे. त्याच्या प्री इव्हेंटमध्ये मेगास्टार चिरंजीवीही उपस्थित होते.
Teja Sajja HanuMan makers Team Will Donate Rs 5 from each ticket
Teja Sajja HanuMan makers Team Will Donate Rs 5 from each ticket esakal
Updated on

Teja Sajja HanuMan makers Team Will Donate Rs 5 from each ticket : देशभरामध्ये सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा माहौल आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सरकारच्या वतीनं नागरिकांना त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच साऊथ मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींच्या बातम्यांनी नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्याचं झालं असं की, तेजा सज्जा यांचा हनुमान नावाचा चित्रपट येत्या१२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याची जोरदार तयारीही सुरु आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अशातच या चित्रपटाचे निर्माते आणि प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.

हनुमानच्या प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर सध्या त्याचे जोरदार प्रमोशनही सुरु केले आहे. त्याच्या प्री इव्हेंटमध्ये मेगास्टार चिरंजीवीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जे सांगितलं यामुळे त्यांच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले, हनुमानचे निर्माते या चित्रपटाच्या प्रत्येक तिकीटामागे पाच रुपये हे अयोध्या मंदिरासाठी दान म्हणून देणार आहेत. हैद्राबादमध्ये हनुमान या चित्रपटाचा प्री इव्हेंट पार पडला.

यावेळी चिरंजीवीनं सांगितलं की, हनुमानच्या निमित्तानं मेकर्सला एक मोठी घोषणा करायची आहे. त्यांना या चित्रपटाची जेवढी तिकीटं विकली जातील त्या प्रत्येक तिकीटामागे पाच रुपये दान म्हणून दिले जाणार आहेत. मी टीमच्या वतीनं ही घोषणा करतो. या विधायक गोष्टीसाठी मी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घघाटन आणि प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे.

हनुमानमध्ये तेजा सज्जा हा लीड रोलमध्ये आहे. त्याच्याशिवाय विनय राय देखील दिसणार आहेत. अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार आणि राज दीपक शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. हनुमान ही सिनेमॅटिक युनिव्हर्सची पहिली निर्मिती आहे. त्यानंतर त्याचा अधिरा येणार आहे. यानंतर गुंटूर करम, वेंकटेशची सैंधव आणि नागार्जुनची ना सामी रंगाही प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.