Ramayan fame arun govil angry on former minister of delhi govt. rajendra pal gautam,viral video.
Ramayan fame arun govil angry on former minister of delhi govt. rajendra pal gautam,viral video. Google

'माझा हेतू लोकांना भडकवण्याचा मुळीच नाही पण... ', अरुण गोविलांच्या व्हिडीओची रंगली चर्चा

अरुण गोविलांनी आपल्या व्हिडीओतून आप नेते राजेंद्र पाल यांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.
Published on

Arun Govil: दसऱ्याच्या दिवशी बौद्ध धर्म दीक्षा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आम आदमी पार्टीचे मंत्री राजेंद्र पाल यांच्या उपस्थितीत हिंदू देव-देवतांना न मानण्याची शपथ तिथं घेण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात आता रामायण फेम अरुण गोविल यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. चला जाणून घेऊया,राजेंद्र पाल यांच्या विधानावर नेमकं त्यांचं मत काय आहे?

Ramayan fame arun govil angry on former minister of delhi govt. rajendra pal gautam,viral video.
Viral Video: करवा चौथच्या दिवशी राज कुंद्राची तोंड लपवण्यासाठी अजब हरकत; हसावं की रडावं काहीच कळंना..

अरुण गोविल आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आपले विचार नेहमीच लोकांच्या समोर ठेवतात. आता त्यांनी राजेंद्र पाल यांच्या विषयीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते त्यात म्हणाले आहेत,''या घटनेनं मला हे बोलायला भाग पाडलं आहे की अखेर श्रीराम-कृष्ण यांनीच निर्माण केलेल्या पृथ्वीवर हे काय सुरु आहे? शपथ दिली जातेय की आम्ही ब्रह्मा,विष्णू,महेश,हनुमान आणि रामाला मानत नाही. मां दुर्गा,सरस्वती,काली यांची पूजा नाही करणार. शपथ देणारे राजकारणाच्या-धर्माच्या स्वार्थापोटी हे करत आहेत, पण शपथ घेणारे हा विचार का नाही करत की ते जे काही करत आहेत ते योग्य आहे का?. या सगळ्याचा निषेध करायलाच हवा''.

पुढे ते म्हणाले,''जे लोक श्रीरामाला देव न मानण्याची शपथ घेत आहेत,त्यांना माहित आहे का ते कोण आहेत?. प्रभू श्रीरामांविषयी बोलताना अरुण गोविल म्हणाले की,''त्यांनी कधी जाती-धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही. ना कधी त्यांना सत्तेचा हव्यास होता''. पुढे श्रीकृष्णाचा उल्लेख करत अरुण गोविल म्हणाले की,''ज्या भगवत गीतेवर हात ठेवून आपण खरं बोलण्याचं वचन देतो,त्या गीतेचा उपदेश देणाऱ्याचा अपमान करत शपथ घेणं, हे संपूर्ण मानवजातीसाठी खूपच घातक आहे. कृष्णाचा विरोध करणाऱ्यांनी एकदातरी भगवत गीता वाचायला हवी. म्हणजे त्यांना कळेल की त्यांनी पृथ्वीवर जन्म केवळ मानव कल्याणासाठी घेतला होता''.

Ramayan fame arun govil angry on former minister of delhi govt. rajendra pal gautam,viral video.
Katrina kaif: सासरच्यांसोबत असा साजरा झाला कतरिनाचा करवा चौथ,फोटोंनी वेधलं लक्ष...

अरुण गोविल यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही गोष्टीचा विरोध करण्याआधी सर्वप्रथम तिच्याविषयी माहित करुन घेणं म्हत्त्वाचं आहे. स्वार्थाच्या आहारी जात माणसाला विसर पडला आहे की तो सनातन धर्माचा विरोध करत आपल्या मूळापासून लांब जात आहे. रामायण फेम अरुण गोविल यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे की त्यांचा हेतू वाद निर्माण करण्याचा मुळीच नाही ना लोकांना भडकवण्याचा. ते फक्त चुकीच्या विचारांचा विरोध करत आहेत.कारण वाईटाचा नाश झाला नाही तर ते समाजासाठी खूप घातक ठरेल.

Ramayan fame arun govil angry on former minister of delhi govt. rajendra pal gautam,viral video.
Air India विरोधात अभिनेत्यानं उचललं मोठं पाऊल, मनोज जोशींच्या एअरपोर्टवरील व्हिडीओनं खळबळ

माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की,आम आदमी पार्टीतील नेते राजेंद्र पाल यांच्यावर हिंदुंच्या धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप लागला होता. त्यानंतर त्यांना राजीनामा देत पदाचा त्याग केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.