Arun Govil: 'रामायण' फेम अरुण गोविल यांचा शुटिंग दरम्यान अपघात!

प्रभु श्रीरामाची भुमिका साकारुन लोकप्रिय झालेले अरुण गोविल जखमी झाल्याची माहिती समोर आलीय
Arun Govil
Arun Govilesakal
Updated on

'रामायण'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या अरुण गोविल यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अरुण गोविल नुकतेच त्यांच्या 'नोटिस' या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि त्याचवेळी ते जखमी झाले.

अरुण यांची प्रकृती आता ठिक आहे. तरीही शूटिंगदरम्यान ते खुपच वेदनेत होते. मात्र दुखापत झालेली असताना देखील त्यांनी तो शॉट पुर्ण केला. चित्रकूट येथील सेटवर चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.

Arun Govil
kalam 376 Movie: 'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला'! सचिन धोत्रेंच्या 'कलम 374' चित्रपटाची घोषणा

अभिनेता आणि निर्माता आदित्य प्रताप रघुवंशी यांनी या घटनेची माहिती दिली आहे. चित्रकूटच्या सेटवर ही घटना घडली, आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अरुण यांना दुखापत झाली होती. ते शुट करत असलेल्या सीनमध्ये नारायण गुप्ताची भूमिका करणाऱ्या अरुण यांना एक अधिकारी ताब्यात घेण्यासाठी येतो.

याच सीनमध्ये जीपच्या ड्रायव्हने जीप रिव्हर्स घेत असताना अरुणच्या कोपराला धडक दिली. त्यांच्या कोपऱ्याला दुखापत झाली तेव्हा संपूर्ण क्रू घाबरली होती. टिम त्यांच्या मदतीला गेली मात्र दुखापत झालेली असतानाही त्यांनी तो सीन पुर्ण शुट केला. अरुण यांचा हा चित्रपट 2024 च्या सुरुवातीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'नोटिस'चे दिग्दर्शन प्रदीप गुप्ता यांनी केले आहे.

Arun Govil
Prajakta Mali: प्राजक्ता माळी RSS च्या दसरा मेळाव्यात सहभागी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आयुष्यात पहिल्यांदा.."

टीव्हीवरील महाकाव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांची कोणतीही वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. त्यांनी या मालिकेत रामाची भुमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवले आहे. अरुण गोविल यावर्षी 'OMG 2' मध्ये दिसले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.