Ramayana In Theatres: बॉलीवूडमध्ये एखादा ट्रेंड सुरु झाला की, त्यावरुन किमान तीन ते चार चित्रपट जोपर्यत तयार होत नाही तोपर्यत तो बंद काही बंद होत नाही. बऱ्याचदा साऊथममध्ये जे ट्रेंड सुरु आहेत त्याचीही कॉपी करण्याचे काम केले जाते. त्यांच्या कथेवर आधारलेले चित्रपट बॉलीवूडमध्ये मात्र फारशी कमाई करताना दिसत नाहीत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायणावर आधारित आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दंगल, छिछोरेचे दिग्दर्शक नितेश तिवारी रामायणवर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करणार असून त्यांनी त्यासाठी स्टारकास्ट देखील जाहिर केल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत यांच्या आदिपुरुषची चर्चा आहे. यात प्रभास श्रीरामाच्या तर सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या टीझरवरुन मोठा वाद झाल्याचे दिसून आले आहे.
ओम राऊतला अखेर प्रेक्षकांना, नेटकऱ्यांना सांगावे लागावे लागले की, त्यांच्या भावनांना ठेच लागेल असे कोणतेही पाऊल आपण उचलणार नाही. सोशल मीडियावरुन ओमला ट्रोलर्सनं तीव्र शब्दांत सुनावले होते. दुसरीकडे बॉलीवूडकडे नवे विषय, कथा नसल्याचे सातत्यानं दिसून आले आहे. म्हणून काय तर ते पुन्हा रामायण आणि महाभारतासारख्या कथांकडे वळत आहेत. येत्या काळात रामायणावर आधारित किती चित्रपट येणार असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे.
दंगलसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नितेश तिवारी यांनी आता रामायणावर आधारित चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी श्रीरामाच्या भूमिकेत ह्रतिक रोशन तर रावणाच्या भूमिकेत रणबीर कपूरची निवड केल्याचे समजते आहे. याशिवाय सीतेच्या भूमिकेत टॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला विचारणा केल्याचे सांगण्यात आले आहे. साऊथच्या साई पल्लवीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा विचार सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.