Ramiz Raja Trolled : 'लाज वाटायला पाहिजे', व्हिव्हियन रिचर्डसच्या मुलीनं पाकिस्तानच्या रमीज राजाला सुनावलं! नेमकं घडलं काय?

रमीज राजा सोशल मीडियावर चर्चेत असणारा चेहरा आहे. वर्ल्ड कपमध्ये समालोचन करणाऱ्या रमीज राजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ramiz Raja Trolled Comment on Vivian Richards Daughter Masaba
Ramiz Raja Trolled Comment on Vivian Richards Daughter Masabaesakal
Updated on

Ramiz Raja Trolled Comment on Vivian Richards Daughter Masaba : यंदाच्या वर्ल्ड कप मधून पाकिस्तानी क्रिकेट संघाचा प्रवास संपला असला तरी या संघातील माजी खेळाडू चर्चेत आहेत. रमीज राजा हा त्यापैकी एक. रमीज राजा सोशल मीडियावर चर्चेत असणारा चेहरा आहे. वर्ल्ड कपमध्ये समालोचन करणाऱ्या रमीज राजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.

पाकिस्तानच्या माजी खेळाडुंना काय झाले आहे माहिती नाही. ते वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझाकनं बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय वरुन दिलेली प्रतिक्रिया वादाचा विषय झाला होता. त्याचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले होते. त्यानंतर रझाकनं माफीही मागितली होती. त्या प्रकरणानंतर रमीज राजाच्या व्हिडिओनं लक्ष वेधून घेतले आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

यापूर्वी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रीदी, शोएब अख्तर, वकार युनूस यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे वेगळ्याच वादाला सुरुवात झाली होती. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस यांच्यावरील शेरेबाजीला हसून समर्थन दिल्यानं रमीज राजा ट्रोल होताना दिसत आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र व्हिव्हियन रिचर्डस आणि नीना गुप्ता यांची मुलगी मसाबानं रमीज राजाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी मसाबाला पाठींबा दिला आहे.

नेटकऱ्यांनी रमीज राजाला तुला लाज वाटायला हवी, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत त्याच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. एक्स वर आता रमीज राजा ट्रेडिंगचा विषय आहे. रंगभेदाच्या त्या शेरेबाजीवर रमीज राजानं हसून दाद दिल्यानं तो टीकेचा विषय झाला आहे. त्यावर मसाबानं रमीजला दिलेलं उत्तर लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

मसाबानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, रमीज राजा (सर) फार कमी लोकांमध्ये दयाळुपणा, प्रेमळपणा आणि आदराची भावना दिसून येते. माझ्याजवळ माझे आई वडील दोघेही जण आहेत. पण तुमच्याजवळ तर कुणीच नाही. पाकिस्तानच्या त्या राष्ट्रीय टीव्हीवर तुम्ही त्या गोष्टीवरुन खळखळून हसता आहात हे पाहून वाईट वाटलं. ज्या गोष्टीवर जगानं तीस वर्षांपूर्वीच हसणं बंद केलं होतं. त्यावर तुम्ही हसलात. तुम्ही भविष्याचा विचार करा. आम्ही तिघेजण एकत्र आहोत. अशा शब्दांत मसाबानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानच्या एका राष्ट्रीय वाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिलेनं अभिनेत्री नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड यांच्यावर शेरेबाजी केली. रंगभेदावरुन केलेली ती शेरेबाजी ऐकून रमीज राजानं त्याला हसून दाद दिल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसून येते. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रमीज राजा टीकेचा विषय झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()