Ramsetu Review: 'जय श्री राम'च्या घोषणांनी दुमदुमलं थिएटर, पब्लिकला कसा वाटला अक्षयचा 'रामसेतू'?

दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'रामसेतू'ला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
Ramsetu Twitter review,Akshay Kumar in lead
Ramsetu Twitter review,Akshay Kumar in leadGoogle
Updated on

Ramsetu Review:अक्षय कुमार,जॅकलिन फर्नांडिंस,नुसरत भरुचा यांचा अॅक्शन अॅडव्हेंचर सिनेमा 'राम सेतु' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. एकीकडे जिथे नेटकरी अक्षयच्या या सिनेमाला चांगला सिनेमा म्हणत प्रशंसा करताना दिसत आहेत, तिथे दुसरीकडे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की इंटरवलपूर्वी सिनेमा एखादी डॉक्युमेन्ट्री पाहतोय असा भास करवून देतो. (Ramsetu Twitter review,Akshay Kumar in lead)

Ramsetu Twitter review,Akshay Kumar in lead
Big Boss 4: 'मेघा घाडगे बाहेर पडली आता पुढचं टार्गेट...',तेजस्विनीनं नावच जाहीर केलं

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या प्रेक्षकांचे म्हणणे आहे की सिनेमाचे व्हीएफक्स चांगले वाटत नाहीत,पण अंडरवॉटर शूट केलेले पाण्यातील काही सीन खूप छान शूट केले गेले आहेत.. काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे की इंटरवल नंतर सिनेमा खूप इंट्रेस्टिंग होत जातो.

Ramsetu Twitter review,Akshay Kumar in lead
Box Office: 'रामसेतू की थॅंक गॉड', पहिल्या दिवशी कोण कोणावर पडलं भारी?, समोर आले आकडे...

अभिषेक शर्मा दिग्दर्शित या सिनेमाच्या ओपनिंग डे च्या अॅडव्हान्स बूकिंगनं खूप फायदा झालेला नाही, असं समोर आलं आहे. याचं एक मोठं कारण असू शकत की दिवाळीच्या सुट्टयांमुळे लोका घराबाहेर फार पडताना दिसत नाही आहेत. तर दुसरी गोष्ट मंगळवारी सूर्यग्रहण असल्या कारणानं लोक घराबाहेर पडणं टाळत आहेत.

अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक असे तीन सिनेमे फ्लॉप झाले आहेत. अशामध्ये आता रामसेतू ला जर सुपरहिट बनवायचं असेल तर वर्ड ऑफ माऊथ महत्त्वाचं ठरू शकतं. पण या सिनेमाबाबतीत एक गोष्ट चांगली घडताना दिसतेय की सिनेमा पाहून थिएटरच्या बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग खूप चांगल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. आणि रामसेतू च्या बाबतीत ही गोष्ट कमाल करुन दाखवू शकते.

'राम सेतु' सिनेमा बॉक्सऑफिसवर अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'थॅंक गॉड' सोबत रिलीज झाला आहे. दोन्ही सिनेमांची बॉक्सऑफिसवर टक्कर झाल्यानं नुकसान होऊ शकतं हे देखील नाकारता येणार नाही. पण दिवाळी,छठ पूजा असे एकापाठी एक येणारे सण आणि त्यानिमित्तानं असलेल्या सुट्ट्यांचा बॉक्सऑफिसवर कलेक्शनसाठी फायदा देखील होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.