Rana Daggubati Reveals : 'बाहुबलीसाठी 400 कोटी 24 टक्के व्याजानं घेतले!'

बाहुबली चित्रपटामध्ये निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या राणा दग्गुबातीची लोकप्रियता मोठी आहे. सोशल मीडियावर देखील त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
Rana Daggubati
Rana Daggubati esakal
Updated on

Rana Daggubati SS Rajamouli Bahubali 400 Cr Loan 24 Percent : फिल्ममेकिंग हा काही सोपा व्यवसाय नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि आर्थिक पाठबळाची गरज असते. काही चित्रपटांना रसिक डोक्यावर घेतात. मात्र त्यामागील आर्थिक गणितं आणि दिग्दर्शकाला कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं याविषयी माहिती नसतं. बाहुबली हा चित्रपट जगभर लोकप्रिय झाला. मात्र त्यासाठी कशाप्रकारे पैसा उभा केल्या त्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे.

बाहुबली चित्रपटामध्ये निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या राणा दग्गुबातीची लोकप्रियता मोठी आहे. सोशल मीडियावर देखील त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून दाक्षिणात्य चित्रपटातील मोठे नाव म्हणून राणा दग्गुबातीचे नाव घ्यावे लागेल. इंडिया टुडेशी बोलताना त्यानं बाहुबली बनवताना आम्हाला किती मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं याबद्दल सांगितलं आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी चित्रपट बनविण्यासाठी पैसा कशाप्रकारे उभा केला याविषयी त्यानं काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

राणा दग्गुबातीनं सांगितलं की, तीनशे ते चारशे कोटी रुपये आम्हाला व्याजानं घ्यावे लागले होते. चित्रपटाचे प्रॉडक्शन मोठे होते. त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. पहिला भाग बनवणे सोपे नव्हते. त्याहीपेक्षा तो प्रेक्षकांना आवडेल की नाही याची खात्री नव्हती. अशावेळी आम्हाला खूप टेन्शनही आले होते. त्यामुळे आम्हाला काही करुन त्या पुढील दिवसांत यशस्वी व्हायचेच होते. अशीही प्रतिक्रिया राणानं दिली.

राणानं सांगितलं की, साडे पाच वर्षांसाठी आम्ही २४ टक्के व्याजानं पैसे घेतले होते. त्यामुळे काही करुन आम्हाला तो चित्रपट यशस्वी झालेला पाहायचा होता. आमचे त्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आम्ही त्यावेळी बाहुबली २ चे देखील शुटींग पूर्ण केले होते. खूप संघर्ष आणि वेगळा अनुभव देणारा तो काळ होता.

Rana Daggubati
The Kerala Story: सुकलेले ओठ अन् त्याला पडलेल्या जखमा... शूटिंगदरम्यान अदाची झालेली भयानक अवस्था

आम्ही त्यातून पार झालो याला कारण आमच्यातील सकारात्मकता. जर बाहुबली सारखा चित्रपट चालला नसता तर मला खूप वाईट वाटले असते. आम्ही ज्यांच्याकडून पैसे व्याजानं घेतले होते त्यांना आम्ही काय उत्तर देणार होतो. असेही राणानं यावेळी सांगितले.

Rana Daggubati
RRR Actor Death: 'आरआरआर' च्या खलनायकाचं निधन..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()