'रानबाजार'(Ranbajar) या वेबसिरीजची(Webseries) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता पर्यंत या वेबसिरीजचे ५ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रेक्षकांना पुढील भागाची उत्सुकता आहे. पुढील भाग येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. कारण प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या वेबसिरीजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांच्या समावेश आहे. यात तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit) , प्राजक्ता माळी(Prajakta Mali), मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे नावाजलेले कलाकार दिसत आहेत.
पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजमध्ये मोहन आगाशे हे सतीश नाईक या भूमिकेत आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारली आहे. तर मकरंद अनासपुरे या वेबसीरिजमध्ये दिवेकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत, ते अगदी अनुभवी राजकारण हलवणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर दिग्दर्शक अभिजित पानसे हे पहिल्यांदा अभिनय करताना दिसत आहेत.त्यांनी इन्स्पेक्टर चारुदत्त मोकाशी ही भूमिका साकारली आहे. आणि मोहन जोशी म्हणजेच सयाजी पाटील यांच्या भूमिकेत दिसत आहेत. सचिन खेडेकर युसुफ पटेल साहेब ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.तर वैभव मांगले हे इस्पेक्टर पालांडे या भूमिकेत दिसत आहेत. उर्मिला कोठारे यांनी निशा जैन ही व्यतिरेखा साकारली आहे. माधुरी पवार ही सयाजी पाटील यांची मुलगी प्रेरणा सयाजीराव पाटील या व्यक्तिरेखेत दिसत आहे.
'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' या वेबसीरिजमध्ये कलाकारांचा मोठा फौजफाटा आहे. अभिजित पानसेने ही वेब सिरीज उच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे. त्यात मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या सर्व तगड्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे 'रानबाजार'ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडून पुढील भाग लवकर प्रदर्शित करा, अशी मागणी केली जात आहे.
या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून अभिजित पानसे आणि 'रानबाजार' संपूर्ण टीमने केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे लक्षात येते.आणि 'रानबाजार' या वेबसिरीजमुळे प्लॅनेट मराठी ओटीटीला सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली आहे."अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी अक्षय बर्दापूरकर, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.