रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचे लग्न जणू जागतिक सोहळाच झाला आहे, जिथे तिथे त्यांच्या लग्नाच्याच चर्चा आहेत. हे लग्न १४ एप्रिल रोजी होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत माहिती कुटुंबीयांनी अजून उघड केलेली नाही. परंतु या लग्नाची तयारी मात्र जोरदार सुरु झालीआहे. दिवसेंदिवस त्याबाबत अधिक माहिती समोर येत आहेत.
सध्या त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी रोषणाई, सजावट, खानपान यांची जय्यत तयारी सुरु आहे. या लग्नात सुरक्षिततेचीही तितकीच काळजी घेतली जात आहे. या पूर्वतयारीसाठी आता अनेक कामगार, कर्मचारी, सुरक्षारक्षक येऊ लागले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून लग्नाच्या बातम्या, फोटो व्हायरल होऊ नये याची पूर्ण दक्षता तिथल्या व्यवस्थापकांनी घेतली आहे.
त्यांचे कारणही तसेच आहे. हा या वर्षातील सर्वात मोठा विवाहसोहळा असून जगभरातील चाहत्यांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. रणबीर कपूर १४ एप्रिलला आलिया भट्टसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहेत. आज १३ एप्रिलला त्यांचा मेहंदी सोहळा होणार असल्याचीही चर्चा आहे. परंतु या प्री-वेडिंग फंक्शन्सच्या (pre wedding function ) आधी, स्टाफच्या (staff's phon) फोनचे कॅमेरे स्टिकर्सने झाकण्याची सक्ती केलेली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे.
लग्नातील बातम्या, सोहळे आणि एकूणच समारंभाचे फोटो बाहेर लीक होऊन नये. यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा सोहळा अतिशय गोपनीय असेल असा अंदाज आता वर्तवला जात आहे. सध्या रणबीरच्या बान्द्रा येथील घराजवळ कडक सुरक्षा तैनात असलेली दिसून येतेय. त्याची इमारत रोषणाईनं झगमगतेय आणि फुलांनी सजलेली दिसतेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.