Ranbir Kapoor: रणबीर कपूर सध्या ट्रोलर्सच्या(trollers) निशाण्यावर आहे. त्याचा आगामी 'ब्रह्मास्त्र' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेन्डचा(boycott trend) सामना करताना दिसतोय. त्याच्या काही जुन्या व्हिडीओंना शोधून शोधून काढतायत लोक. आता नेटकऱ्यांच्या हाती त्याचा एक ११ वर्षापूर्वीचा व्हिडीओ लागला आहे. ज्यातील रणबीरचं खळबळजनक विधान ऐकून नेटकऱ्यांचा राग राग होताना दिसत आहे. या व्हिडीओत रणबीर म्हणत आहे 'मला गोमांस खायला आवडतं'. पण यामुळे ट्वीटरवर 'ब्रह्मास्त्र बॉयकॉट' करण्याची मागणी केली जात आहे. पण रणबीरच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की हा व्हिडीओ एडिट केला गेला आहे.(Ranbir Kapoor Beef Video viral ahead of boycott brahmastra trend on twitter)
बोललं जात आहे की, २०११ सालातला हा वादग्रस्त व्हिडीओ आहे. एका मुलाखती दरम्यान रणबीर कपूर म्हणताना दिसतोय,''मला मटण, पाया,रेड मीट खूप आवडतं. तसंच,मला गोमांस खायला खूप आवडतं. आणि बदकही''. अर्थात दावा केला जात आहे की हा व्हिडीओ एडिट केला गेला आहे.
आता या व्हिडीओला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. ट्रोलर्स भलतेच भडकलेले दिसत आहेत. ट्वीटच्या माध्यमातून ट्रोलर्स आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत. बातमीत काही त्या संदर्भातले ट्वीट्स जोडले आहेत,ते पाहिले की कल्पना येईलच तुम्हाला.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'प्रमोशन करताना लोकांना दाखवण्यासाठी काटे-चमचे न घेता हातानं जेवण जेवतो पण इतर दिवशी मात्र हा बीफ Guy आहे'.
तर एकानं चक्क लिहिलं आहे, 'ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्याचं मोठं कारण मिळालं. याचं नाव मोठं,लक्षण खोटं आहे. हे सगळे बॉलीवूडकर एकच आहेत'.दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'एसएस राजामौली यांना देखील आता दुःख झालं असेल रणबीरच्या सिनेमाला प्रमोट केल्यानंतर'.
आणखी एक ट्वीट व्हायरल झालं आहे,ज्यात लिहिलं गेलं आहे की,'फक्त पब्लिसिटी स्टंट करतोय हा. मलाही दक्षिणेकडची संस्कृती आवडते असं निव्वळ नावाला म्हणतोय रणबीर, पण खरंतर बॉलीवूड अशी इंडस्ट्री आहे,जी हिंदू धर्माला संपुष्टात आणत आहे. दक्षिणेच्या सिनेमांचे चाहते तुझ्या या फसवेगिरीला भुलणार नाहीत रणबीर'.
'ब्रह्मास्त्र' सिनेमा ९ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये रणबीर कपूर,आलिया भट्ट, अमिताभ बच्चन,नागार्जुन आणि मौनी रॉय असे बडे स्टार आहेत. याच्या प्रमोशनसाठी मेकर्सनी कंबर कसली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमाचा निर्माता करण जोहरने काही दिवसांपूर्वीच सागितलं की २ सप्टेंबरला हैदराबाद येथे या सिनेमासंदर्भात रिलीज आधीचा एक कार्यक्रम पार पडेल. ज्यात RRR स्टार ज्युनिअर एनटीआर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.