Ranbir Kapoor: 'अ‍ॅनिमल' नंतर रणबीरचा भाव वाढला! पुढील चित्रपटांसाठी घेणार 'इतके' कोटी?

बॉलीवूडचा अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल नावाचा चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली.
Ranbir Kapoor doubled his fees after the success of Animal :
Ranbir Kapoor doubled his fees after the success of Animal :
Updated on

Ranbir Kapoor doubled his fees after the success of Animal : बॉलीवूडचा अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल नावाचा चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. त्यानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले.त्यानं आठशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. संदीप रेड्डी वांगाच्या या चित्रपटानं रणबीरला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

या सगळ्यात येत्या काळात रणबीरच्या नावानं जे चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्यामध्ये त्यानं घेतलेलं मानधनही विक्रमी आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. काही रिपोर्टसनुसार, रणबीरनं त्याच्या मानधनात दुप्पट वाढ केल्याचे समजते आहे. अॅनिमल हा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. संदीप रेड्डीच्या अॅनिमल चित्रपटाला एक महिना लोटून गेला असला तरी त्याचा प्रभाव काही कमी झालेला नाही. ओटीटीवरही हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

अॅनिमल जेवढा लोकप्रिय झाला तेवढ्याच प्रमाणात त्याच्यावर टीकाही झाली होती. त्यात जावेद अख्तर, कंगना रनौत आणि कोंकणा सेन शर्मा यांनी रणबीरच्या अॅनिमलवर वेगळ्या प्रकारची टीका केली होती. त्यामुळे वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरु झाली होती. पण कुणी काही का म्हणेना रणबीरच्या या चित्रपटानं त्याला वेगळ्याच उंचीवर नेल्याचे दिसून आले आहे.त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढही झाली आहे.

येत्या काळात अॅनिमलचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरचा समावेश हा टॉपच्या अभिनेत्यांमध्ये करण्यात आला आहे. आता सुत्रांनी माहिती दिली आहे की, त्यानं अॅनिमलनंतर त्याच्या मानधनात वाढ केली आहे. तीस कोटी रुपये मानधन घेणाऱ्या रणबीरनं यापुढील काळात त्याची फी ६५ कोटी रुपये केल्याची माहिती आहे. या सगळ्यात रणबीरकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जनसत्तानं याबाबत वृत्त दिले आहे.

Ranbir Kapoor doubled his fees after the success of Animal :
Animal Movie Offer: 'अ‍ॅनिमल'च्या मेकर्सची मोठी ऑफर! आता सिनेमाचा आनंद घ्या फक्त 'इतक्या' रुपयांमध्ये

अॅनिमलसाठी रणबीरनं ७० कोटींचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. रणबीरनं आता मानधनात वाढ केल्यानंतर तो पहिलाच असा अभिनेता नसेल की ज्यानं मोठं यश मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मानधनात वाढ केली आहे. यापूर्वी देखील अनेक अभिनेत्यांनी अशाप्रकारे निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.