Randeep Hooda: मांजरेकरांऐवजी रणदीप हुड्डाच करणार 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चं दिग्दर्शन

महेश मांजरेकर दिग्दर्शित करत असलेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका आता रणदीप हुड्डाच करणार असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
randeep hooda direct his biopic movie swatantryaveer savarkar shooting started release date 26 may mahesh manjrekar reject this film
randeep hooda direct his biopic movie swatantryaveer savarkar shooting started release date 26 may mahesh manjrekar reject this filmsakal
Updated on

randeep hooda: नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २६ मे २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

(randeep hooda direct his starrer biopic movie swatantryaveer savarkar shooting started release date 26 may mahesh manjrekar reject this film )

निर्माते आनंद पंडित याबाबत बोलताना असे म्हणाले की, "या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी रणदीप हुड्डाशिवाय दुसरा कोणताही अभिनेता असू शकत नाही. शिवाय, या चित्रपटाचे दिग्दर्शनही रणदीपच करणार आहे त्यामुळे नक्कीच ही अभिमानाची बाब आहे."

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये होणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची असून उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजेंड स्टुडिओ, निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान यांनी केली आहे तर चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली आहे.

या आधी महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. ते स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. परंतु अचानक यामध्ये मोठा बदल झाला असून रणदीपच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे आता सावरकरांची भूमिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी रणदीपवर आहे. मांजरेकरांनी हा चित्रपट का सोडला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.