Randeep Hooda: "सिनेमा बनवण्यासाठी घर विकलं"; 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं सडेतोड उत्तर

Randeep Hooda: 'हा प्रपोगंडा सिनेमा आहे', असा आरोप 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटावर अनेकांनी केला. आता याबद्दल एका मुलाखतीमध्ये रणदीपनं सडतोड उत्तर दिलं आहे. त्याच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Randeep Hooda
Randeep Hooda esakal
Updated on

Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'हा प्रपोगंडा सिनेमा आहे', असा आरोप या चित्रपटावर अनेकांनी केला. अशातच आता याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रणदीपनं सडतोड उत्तर दिलं आहे. त्याच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाला रणदीप?

आता हे सरकार आलं आहे, त्यामुळे अशा प्रकारचा चित्रपट येत आहे, असा आरोप तुझ्यावर कुणी केला आहे का? असा प्रश्न एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात रणदीपला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रणदीप म्हणाला, "कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना, लोक काहीही बोलतात, हा सिनेमा तयार करण्यासाठी मला कोणीही मदत केलेली नाही. या सिनेमासाठी मी माझं घर विकलं आहे. मी हा सिनेमा सावरकरांवर झालेला अन्याय दाखवण्यासाठी बनवला आहे. तुम्ही कोणत्या प्रोपगंडाबद्दल बोलत आहात? प्रपोगंडा चित्रपटासाठी एक-दीड वर्ष कोण मेहनत करतं? मी या सिनेमासाठी काय केलं आहे, ते मला माहित आहे. पण लोक काहीही विचार करु शकतात."

रणदीप म्हणाला होता, "हा चित्रपट अँटी-प्रपोगंडा चित्रपट आहे"

'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाला 'प्रपोगंडा फिल्म' म्हटलं जात आहे, याबद्दल काय सांगशील? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी ANI च्या मुलाखतीत रणदीपला विचारण्यात आला. तेव्हा रणदीप म्हणाला होता, हा 'अँटी-प्रपोगंडा' चित्रपट आहे. सावरकरांविरोधात अनेक वर्षांपासून चालवलेला प्रपोगंडा, त्यांच्याबद्दल बोलल्यात आलेले वेगवेगळे शब्द त्या सर्वांचा भांडाफोड करण्यासाठी आणि सत्य लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट आहे."

Randeep Hooda
Randeep Hooda: "हा अँटी-प्रोपगंडा चित्रपट आहे"; स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डा थेटच बोलला!

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाची स्टार कास्ट

रणदीपसोबतच या चित्रपटात अंकिता लोखंडे, अपिंदरदीप सिंह यांनी देखील काम केलं आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.