Randeep Hooda Wedding: रणदीप लवकरच चढणार बोहल्यावर! कोण आहे होणारी बायको?

Randeep Hooda Wedding:
Randeep Hooda Wedding:Esakal
Updated on

Randeep Hooda Wedding: बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिभावान अभिनेते आहे ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. असाच एक अतिशय प्रतिभावान अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा.

रणदीपने आपल्या दमादार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रणदीपच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु आज रणदीप हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

रणदीप बऱ्याच काळापासून लिन लैशरामला डेट करत आहे. रणदीप - लिन यांनी त्यांचे नातेही जाहीर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. मात्र आता रणदीप हुड्डा त्याची प्रियकर लिन लैशरामसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

Randeep Hooda Wedding:
Shah Rukh Khan : किंग खान कोणत्या सेलिब्रेटींना म्हणतो बेटा अन् कुठल्या अभिनेत्रीला म्हणतो आई?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रणदीप आणि लिन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हे कपल नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लग्न करणार आहे. मात्र त्यांचे लग्न मुंबईत होणार नाही. रणदीप आणि लिन हे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत.

Randeep Hooda Wedding:
Tiger 3: सलमानच्या टायगर 3 ला टक्कर देणार दोन मराठी सिनेमे, ऐन दिवाळीत रंगणार तगडी स्पर्धा

मात्र रणदीपने सध्या त्याच्या लग्नाबद्दल कोणालाही काहीही सांगू इच्छित नसल्याचे बोलले जात आहे. लग्नानंतरच तो ही गोड बातमी त्याच्या चाहत्यांना देणार आहे.

47 वर्षीय रणदीप त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या लिनसोबतच्या नात्याबद्दल कधीच जाहिरपणे बोललेला नाही. मात्र दोघेही 2016 पासून एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहेत. 2018 मध्ये दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले ज्यानंतर त्याच्या नात्याच्या अफवा पसरल्या होत्या तर 2022 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रणदीपने लिनसोबतचे फोटो शेअर करून आपल्या नात्याबद्दल सांगितले होते.

Randeep Hooda Wedding:
Virat Kohli Birthday: 'मी तुझ्यावर कायम प्रेम करेन...',अनुष्कानं 'पतीदेव' विराट कोहलीला दिल्या वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा

लिन ही मणिपूरमधील प्रसिद्ध मॉडेल आणि बिझनेस वूमन आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपचाही ती एक भाग आहे. लिन ही देखील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अलीकडेच सुजॉय घोषच्या 'जाने जान' या चित्रपटात दिसली होती ती याशिवाय 'ओम शांती ओम', 'रंगून' आणि 'मेरी कॉम' या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

तर रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'तेरा क्या होगा लवली'मध्ये दिसणार आहे, ज्यात इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो वीर सावरकर यांच्या जीवनावरील स्वातंत्र वीर सावरकर या चित्रपटात दिसणार आहे.

त्याचबरोबर तो नीना गुप्ता, गुलशन ग्रोवर आणि संजय मिश्रा यांच्यासोबत 'पछत्तर का छोरा' मध्ये काम करणार आहे. याशिवाय तो 'लाल रंग 2' आणि 'मर्द' या चित्रपटातही दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.