Randeep Hooda Movie : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा हा आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो सध्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकची तयारी करतो आहे. काही दिवसांपूर्वी रणदीपचा सावरकरांच्या वेशभूषेतील लूक व्हायरल झाला होता. त्याला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
रणदीप जेव्हा सावरकरांची भूमिका साकारणार अशी बातमी व्हायरल झाली तेव्हापासून त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यापूर्वी देखील रणदीपनं सरबजित सिंगच्या बायोपिकमध्ये काम केले होते. त्यावेळी त्याची भूमिका आणि लूक याचे कौतूक झाले होते. त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी, समीक्षकांनी प्रशंसा केली होती. आता तो सावरकर यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
रणदीपनं सावरकरांची भूमिका साकारताना प्रचंड मेहनत केल्याचे त्याच्या लूकवरुन दिसते आहे. आज तकनं त्याची मुलाखत घेतल्यानंतर रणदीपनं आपण या भूमिकेसाठी काय मेहनत केली, कशाप्रकारे डाएट फॉलो केला याविषयी सांगितले आहे. त्याची ती मुलाखत चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. रणदीपनं म्हटलं आहे की, त्यानं सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केलं आहे.
चार महिन्यांपासून रणदीप केवळ खजूर आणि दूध याचा आहार घेतो आहे. दुसरीकडे त्याच्या या डाएट प्लॅनवरुन त्याला आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. काहींनी त्याचं कौतूक केलं आहे. त्याला काही नकारात्मक प्रतिक्रियांचा देखील सामना करावा लागला आहे. रणदीपनं आणखी काही दिवस हेच डाएट फॉलो केलं तर तो आजारी पडेल. असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
रणदीपनं पुढे म्हटले आहे की, सोशल मीडियावर माझ्याविषयी जी चर्चा आहे त्यावर चाहत्यांनी फार विश्वास ठेवू नये. मला असे वाटते मी जे काही करतो त्याची त्यांनी कॉपी करु नये. मला एक गोष्ट सांगायचे आहे की, मी फक्त दूध आणि खजूर यांचाच आहार घेत नव्हतो. मलाही त्याबाबत सल्ला देण्यात आला होता. मी फक्त तेच घेत होतो अशी माहिती जी व्हायरल होत आहे त्याचा फार विचार करु नका.
सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी मी २६ किलो वजन कमी केले आहे. कलाकारांना एखादी भूमिका करताना संबंधित व्यक्तिरेखेच्या देहबोलीचा देखील विचार करावा लागतो. त्यावेळी माझे वजन हे ६७ किलो होते. त्यासाठी मला माझ्या डाएटचा खूप उपयोग झाला. असेही रणदीपनं यावेळी सांगितले. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मेकर्सनं दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.