राणी मुखर्जी(Rani MUkerji)नं तिच्या आयुष्यतील एका सर्वात मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे,जो तिच्या जन्माशी जोडलेला आहे. किस्सा इंट्रेस्टिंग आहे,पण कदाचित अख्ख्या मुखर्जी कुटुंबाच्या जीवावर तो प्रसंग बेतला असता. काय घडलं होतं नेमकं राणी मुखर्जीच्या बाबतीत? राणीचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा हॉस्पिटलमध्ये तिची आणि एका पंजाबी कुटुंबातील बाळाची अदलाबदल झाली होती. तिनं तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं,''माझी आई कृष्णा मुखर्जीला माझा जन्म झाल्यानंतर सारखं वाटतं होतं की माझ्याकडे जे बाळ आहे ते माझं नाही. आणि मग ती हॉस्पिटलच्या आवारात,इतर रुम्समध्ये नुकत्याच जन्म झालेल्या बाळांना जाऊन पाहू लागली,शोधाशोध करू लागली. तेव्हा तिनं मला एका पंजाबी कुटुंबासोबत पाहिलं''.
राणी मुखर्जी निर्माते-दिग्दर्शक राम मुखर्जी आणि कृष्णा मुखर्जी यांची मुलगी आहे. राणीच्या मोठ्या भावाचे नाव राजा मुखर्जी आहे. तसंच काजोल आणि अयान मुखर्जी यांची ती चुलत बहिण देखील आहे. राणीनं तिच्या एका जुन्या मुलाखतीत तिच्या जन्माच्यावेळचा हा बाळांची अदलाबदल झालेला किस्सा सांगितला होता. ''माझ्या जन्मानंतर हॉस्पिटलवाल्यांनी चुकून मला पंजाबी कुटुंबाच्या सुपूर्द केलं. पण ही गोष्ट कुणास ठाऊक कशी पण माझ्या आईच्या लक्षात आली. तिनं मला शोधून काढलं आणि परत तिच्यासोबत घेऊन आली. आईच्या हातात जेव्हा दुसरं बाळ दिलं तेव्हा तिनं लगेच त्या बाळाला पाहिल्यावर म्हटलंहे माझं बाळ नाही. माझ्या बाळाचे डोळे तपकिरी रंगाचे होते. या बाळाचे डोळे तसे नाहीत. जा,आणि माझं बाळ मला आणून द्या''.
''पण माझी आई कुठे तोवर शांत बसतेय,ती स्वतः शोध घेऊन लागली माझा. तिथे एक पंजाबी कुटुंब होतं. ज्यांच्या घरात आठवी मुलगी झाली होती. आणि मी तिथे आईला सापडले. आता आदित्य चोप्रासोबत लग्न झाल्यानंतर आई मला विनोदानं म्हणते,तू खरंच पंजाबी होतीस. माझीच चुकी आहे मी तुला परत घेऊन आली''. राणीनं आदित्य चोप्रासोबत इटलीमध्ये गुपचूप लग्न केल्याची भलतीच चर्चा तेव्हा रंगली होती. २०१४ एप्रिलमध्ये राणी मुखर्जीनं निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केलं होतं. राणी-आदित्यला आदिरा नावाची गोड मुलगी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.