Mrs Chatterjee Vs Norway Actress Rani Mukerji Birthday : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राणी मुखर्जीनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कॉमेडी, थ्रिलर, क्राईम, सस्पेन्स, फॅमिली ड्रामा सारख्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट राणीनं केले. त्यातून तिला अमाप लोकप्रियता मिळाली होती.
ज्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्यांकडे चित्रपटाचा मुख्य कणा म्हणून पाहिलं गेलं अशा काळात राणीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वताचे वेगळे स्थान निर्माण केले होते.
तिनं तिच्या अभिनयाच्या ताकदीवर चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी करुन दाखवले. आज राणीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्या आयुष्यातील काही वेगवेगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.
Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
राणीचा सध्या मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे नावाचा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राणी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान राणीनं आपला बॉलीवूडचा प्रवास हा दिसतो तितका सोपा नव्हता.
आपल्यालाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले असे म्हटले आहे. खासकरुन माझी उंची, आवाज आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझा सावळा रंग यामुळे कित्येक निर्मात्यांनी आपल्याला डावलल्याचे राणीनं म्हटले आहे.
राणीनं वयाची ४५ वर्ष पूर्ण केली आहे. राणी अजुनही सोशल मीडियावर सक्रिय आहे. वेगवेगळ्या रियॅलिटी शो आणि महोत्सवांमध्ये तिचा सहभाग दिसून येतो. अशावेळी राणीला बॉलीवूडमध्ये ज्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं त्याविषयी तिनं सांगितलं आहे.
राणीनं १९९६ मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तिची ओळख १९९८ पासून चाहत्यांना झाली. राणीच्या वडिलांनी राम मुखर्जी यांनी तिला बियेर फुल नावाच्या चित्रपटासाठी कास्ट केले होते. त्यानंतर राणीचा राजा की आयेगी बरात नावाचा चित्रपट आला आणि त्यातून ती लोकप्रिय झाली.
राणीला देखील स्वताच्या आवाजाचा, दिसण्याचा आणि रंगाचा कॉम्प्लेक्स होता. तिच्या मते अभिनेत्री होण्यासाठी श्रीदेवी आणि रेखा यांच्यासारखं व्यक्तिमत्व होणं गरजेचे आहे असे म्हणणे होते.
राणीला तिच्या दिसण्यावरुन आणि आवाजावरुन खूप ट्रोल करण्यात आले होते. तिचा गुलाम नावाचा जो चित्रपट होता त्यात तिचा आवाज डब करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.