नवरा म्हणून कसा आहे रणवीर सिंग, दीपिकाला देतो का इंटीमेट सीनसाठी परवानगी?

अभिनेता रणवीर सिंग आज वाढदिवस.. वाचा असे आहेत त्याचे आणि दीपिकाचे नाते..
Entertainment News, Bollywood News in Marathi
Entertainment News, Bollywood News in Marathisakal
Updated on

ranveer singh birthday : बॉलीवूड मधील एक उत्तम नट, तितकाच उत्तम माणूस आणि सतत हस- हवतस राहणारा अभिनेता म्हणजे 'रणवीर सिंग'. रणवीर सिंगने सध्या बॉलीवूड वर त्याच्या नावाची मोहर उमटवली आहे. आजवर विविध चित्रपटांमधून त्याने साकारलेल्या भूमिकांमुळे मोठा चाहतावर्ग मिळवला. त्याचा स्वभाव आणि त्याचे काम यामुळे त्याचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आज रणवीरचा वाढदिवस. त्याने ३७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. रणवीर आणि दीपिका हे बॉलीवुड मधील सगळ्यांच्या आवडते कपल आहेत. आज रणवीर (ranveer singh) च्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या वैवाहिक आयुष्यातील एक खास बात..(Bollywood News in Marathi)

(ranveer singh birthday deepika padukone take permission from ranveer singh for intimate scene)

Entertainment News, Bollywood News in Marathi
Ranveer singh birthday : मुलगा हवा की मुलगी.. रणवीरनं दिलं भन्नाट उत्तर..

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (deepika padukon) २०१८ मध्ये विवाह बंधनात अडकले. या जोडीवर चाहतते भरभरून प्रेम करतात. रणवीर आणि दीपिका दोघेही समाज माध्यमांवर अनेक गोष्टी शेअर करतात असल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय हे पाहण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. दीपिकाने नुकताच 'गहराईया' हा चित्रपट केला होता. ज्यामध्ये दीपिकाने तिचा सह कलाकार सिद्धांत चतुर्वेदी सोबत काही बोल्ड सीन दिले होते. यावेळी हे बोल्ड सीन देण्याआधी नवरा रणवीर सिंगची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला.

या वेळी दीपिका आणि रणवीरच्या नात्याविषयीही बोलले गेले होते, त्यावेर दीपिका म्हणाली होती, 'जर यावर मी प्रतिक्रिया दिली तर तो मुर्खपणा ठरेल. आपण केलेल्या कामावर लोक काय म्हणतात, काय कमेंट करतात याचा मी कधीच कमेंट्स वाचत नाही आणि मला वाटतं रणवीरही ते करत नसावा. अगदीच रणवीर विषयी सांगायचं तर त्याला माझ्या कामाचा अभिमान वाटतो. माझ्या चित्रपटाचाही त्याला अभिमान वाटेल. या चित्रपटातील माझा अभिनय देखील त्याला आवडला आहे.’

पुढे ती म्हणते, ‘गहराइयां’ सारखा बोल्ड चित्रपट निवडण्याचं श्रेय पती रणवीर सिंहला देते. त्याच्यामुळेच मी एवढी बोल्ड झाले.' या मुलाखती नंतर रणवीरचे अनेकांनी कौतुक केले. शिवाय दीपिका आणि रणवीरच्या बॉन्ड विषयीही बोलले गेले. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत 'मी दीपिकाचा नवरा.. रणवीर सिंग' असं रणवीर म्हणाला. त्यांनंतर एखाद्या पुरुषाने बायकोच्या नावावरून आपली ओळख सांगणारा हा पहिला अभिनेता म्हणून त्याचे कौतुक झाले. अगदी स्त्रीवादी विचारधारेच्या लोकांनी ही त्याच्या या वक्तवव्याचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.