Ranveer Singh Bollywood Actor virat kohli : बॉलीवूडमध्ये सर्वाधिक उत्साही, अतरंगी अभिनेता म्हणून रणवीर सिंगची ओळख आहे. प्रसिद्धीसाठी रणवीर काय करेल हे अनेकदा दिसून आले आहे. यापूर्वी त्यानं शुट केलेल्या न्युड फोटोशुटमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यावरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. यासगळ्यात रणवीरच्या पाठीशी बॉलीवूडमधील अनेक कलाकार उभे राहिले होते.
आता रणवीर एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यानं भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकले आहे. रणवीर सिंग हा भारतात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यु असलेला सेलिब्रेटी झाला आहे. त्याच्या अगोदर विराटचे नाव त्या यादीत होते.
Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
आता तो विराट त्या यादीतून आऊट झाला असून त्याच्या जागी रणवीरचे नाव आले आहे. न्यु सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्टनुसार, रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यु ही १८१.७ इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ब्रँडिंग इमेज असणारा चेहरा म्हणून रणवीरचे नाव सांगता येईल. यावेळी रणवीरनं गेल्या पाच वर्षांपासून त्या यादीत आघाडीवर असणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकले आहे.सोशल मीडियावर चाहत्यांनी रणवीरचे कौतूक केले आहे.
कोहलीची ब्रँड व्हॅल्यु १७६.९ मिलियन असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोहलीनं कॅप्टनशीप सोडल्यापासून त्याच्या ब्रँड व्हॅल्युमध्ये देखील मोठा फरक पडल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर दोन वर्षात त्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. २०२० मध्ये कोहलीची ब्रँड व्हॅल्यु २३७ मिलियन एवढी होती. ती २०२१ मध्ये १८५.७ मिलियन एवढी झाली.
या यादीमध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा तिसऱ्या यादीत आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यु ही १५३.६ मिलियन एवढी आहे. यानंतर आलिया भट्टचा क्रमांक आहे. ती या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. दीपिकानं या यादीमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.