Ranveer Singh replaces Shah Rukh Khan: गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर डॉन 3 ची चर्चा रंगली आहे. 'डॉन' फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी एक टीझर रिलीज करत 'डॉन 3'ची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र या चित्रपटात कोणता अभिनेता असणार याची काही माहिती देण्यात आलेली नव्हती.
मात्र आता डॉन आणि डॉन 2 चे दिग्दर्शन करणाऱ्या फरहान अख्तरने डॉन 3 चा धमाकेदार टीझर रिलीज करत यावरुन पडदा उठवला आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननंतर आता रणवीर सिंगने डॉनच्या फ्रँचायझीमध्ये एंट्री मिळवली आहे.
एक मिनिट ४८ सेकंदाच्या या टीझरमध्ये रणवीर सिंगचा जबरदस्त लूक आणि डायलॉग्स प्रेक्षकांना आवडतोय. त्याने त्याच्या लूकवर चांगलेच काम केलं आहे.
या टिझरमध्ये रणवीर सिंग त्याच्या डॅशिंग लुकमध्ये डायलॉग्स बोलताना दिसत आहे. एका उंच इमारतीत बसलेला रणवीर सिंग त्याच्या अंदाजात डायलॉग्स म्हणतोय. अन् शेवटी तो बोलतो, '11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, पर पकड़ पाया है मुझको कौन? मैं हूं डॉन.'
हिंदी चित्रपटांमध्ये डॉनची वेगळीच क्रेझ आहे. या फ्रँचायझीचा हा चौथा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा 1978 मध्ये डॉन चित्रपट केला होता. ज्याचे दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी केलं होते. अमिताभ यांची डॉनची भूमिका ही आयकॉनिक आहे.
त्यांच्यानंतर फरहान अख्तरने 2006 मध्ये शाहरुख खानला बॉलिवूडचा डॉन बनवला. शाहरुखचा डॉन लुक प्रेक्षकांना खुपच आवडला. त्याचा वाढता प्रतिसाद पाहून 2011 मध्ये पुन्हा एकदा फरहानने शाहरुखसोबत डॉन 2 बनवला.
आता मात्र शाहरुखला न घेता फरहानने नवीन डॉन ची ओळख प्रेक्षकांना करुन दिली आहे. आता काही लोक रणवीरला डॉनच्या अवतारात पहण्यासाठी उत्सूक आहे तर काहींनी याला विरोध केला आहे.
यावेळी शाहरुख खान नव्हे तर रणवीर सिंग हा नवा डॉन असणार आहे. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या सुपरस्टारची जागा आता रणवीरनं घेतली आहे.
'बाजीराव मस्ती' असो किंवा 'बेफिक्रे', रणवीर सिंगने प्रत्येक वेळी आपल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत. भयानक भूमिका असो किंवा खोडकर... त्याच्या भुमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकतो. 'डॉन 3' मधील त्याच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तो ज्या प्रकारे जॅकेट घालतो किंवा लाइटर लावतो त्याची स्टाईल प्रेक्षकांना आवडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.