रणवीर सिंगची (Ranveer Singh) मुख्य भूमिका असलेल्या '83' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. २४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून शुक्रवारी जवळपास १३ ते १४ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वकरंडकाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते करत होते. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खानने केलं आहे. (83 Movie Box Office Collection)
२५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटप्रमी कधीच विसरू शकत नाहीत. या दिवशी कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला होता. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय क्रिकेट संघाने चारी मुंड्या चीत केले होते. तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी ही कामगिरी होती. याच विजयगाथेवर हा चित्रपट आहे. कबीर खानने या चित्रपटावर कमालीची मेहनत घेतलेली आहे. अगदी बारीकसारीक बाबींचा विचार ही कथा मांडताना केला आहे.
रणवीर-दीपिकासोबतच या चित्रपटात पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर आणि एमी विर्क अशी कलाकारांची मोठी फौज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.