Ranveer Singh: '4 करोडच्या एस्टन मार्टिनमधून 2 वर्ष बेकायदेशीर फिरतोय..', रणवीरवर नेटकऱ्याचा आरोप

रणवीर सिंंग विरोधात त्याच्या महागड्या एस्टन मार्टिन गाडीवरनं सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter user
Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter userGoogle
Updated on

Ranveer Singh: बॉलीवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंग जवळ बड्या-बड्या गाड्यांचा ताफा आहे हे काही आता लपून राहिलेले नाही. काही दिवसांपूर्वी त्याला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं, जिथे पहिल्यापासून त्याच्यासाठी वाट पाहत असलेली निळ्या रंगाची स्टायलिश एस्टन मार्टिन कार उभी होती. रणवीर मुंबई एअरपोर्टवर पोहोचल्यावर थेट आपल्या गाडीत बसून निघून गेला. पण सोशल मीडियावर मात्र लोकांच्या नजरेनं जे हेरायचं ते हेरलंच. रणवीरच्या कारच्या बाबतीत एक मोठा दावा केला जात आहे,ज्यामुळे रणवीरला मोठा भुर्दंड पडू शकतो.(Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter user)

Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter user
Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter userGoogle

त्याचं झालं असं की ,रणवीर सिंग आपल्या एस्टन मार्टिन गाडीत बसून निघून जाताना त्याच्या गाडीच्या मागे असलेल्या नंबर प्लेटवर लोकांची नजर पडली. आता जगाच्या कुठल्या एका कोपऱ्यात बसलेल्या एका नेटकऱ्यानं दावा केला आहे की,रणवीर ही लक्झरी कार विना-परवाना फिरवत आहे. त्याचं कार इन्शुरन्स कधीच एक्सपायर झालं आहे. एवढंच नाही,तर नेटकऱ्याच्या ट्वीटनुसार,रणवीरनं दोन वर्षापासून ते इन्शुरन्स रिन्यू देखील केलेलं नाही. आता यावरनं हे तर स्पष्ट होत आहे की,रणवीरनं नियमांचे उल्लंघन केले आहे. या नेटकऱ्यानं मुंबई पोलिसांना हे ट्वीट टॅग करत रणवीरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter user
Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter userGoogle

या नेटकऱ्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर रणवीर सिंगवर कडक कारवाई करावी. तो एक अशी गाडी घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरत आहे,ज्याचे इन्शुरन्स पेपर त्याने दोन वर्षापासून रिन्यू केलेले नाहीत. पण एक महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की,नेटकऱ्याच्या त्या ट्वीटला मुंबई पोलिसांनी देखील रिप्लाय दिला आहे. पोलिसांनी आपल्या उत्तरादाखल लिहिले आहे की, 'या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत'.

Ranveer Singh driving 4 crores aston martin without valid insurance claims twitter user
Alia Bhatt Pregnancy: मुंबईत 'या' हॉस्पिटलमध्ये आलिया देणार बाळाला जन्म...

रणवीर सिंगला आता भुर्दंड पडला तर तो लाखोंचा पडणार आहे. रणवीरच्या एस्टन मार्टिन या गाडीची किंमत ३.९ करोड इतकी आहे. अभिनेत्यानं गाडीवर अतिरक्त खर्च करुन तिला मॉडिफाय देखील करुन घेतलं आहे. त्यानं गाडीचा रंग बदलत पाऊडर ब्लू कलर करुन घेतला आहे. थोडं गूगल सर्च केलं तर कळेल की एस्टन मार्टिन या गाडीच्या एका वर्षाचा इन्शुरन्स हा किमान ३ ते ६ लाखाच्या आसपास असतो, गाडीचं व्हर्जन आणि खरेदी केलेलं वर्ष यानुसार तो ठरतो.

आता या सगळ्या प्रकरणावर रणवीरच्या एका चाहत्यानं मात्र त्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानं लिहिलं आहे, 'तो गाडी चालवत आहे,म्हणून जळतोयस का? तुला काय अडचण आहे?', दुसऱ्या एकानं लिहिलं आहे, 'मला वाटतंय रणवीरची उगाचच तक्रार करणारा बेरोजगार आहे,काही काम नाही त्याच्याकडे'.

Ranveer Singh's Aston Martin has valid insurance
Ranveer Singh's Aston Martin has valid insuranceGoogle

आता रणवीरवर विना-परवाना गाडी चालवण्याचे आरोप होत असतानाच समोर आले आहेत त्याच्या एस्टन मार्टिन गाडीचे इन्शुरन्स पेपर जे दर्शवत आहेत की त्यानं त्याच्या गाडीचे इन्शुरन्स पेपर वेळेत रिन्यू करुन घेतले आहेत. पिंकविला वेबसाईला मिळालेल्या माहितीनुसार,रणवीरनं वेळेत त्याच्या गाडीचे इन्शुरन्स पेपर रिन्यू करुन घेतले होते. त्याच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. पण आता पोलिस देखील नेटकऱ्याच्या तक्रारीवरुन या प्रकरणात चौकशी करत आहेत. त्यामुळे नेमकं खरं काय अन् खोटं काय हे आता पोलिसांच्या तपासानंतर समोर येईलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.